रिसोड माहेश्वरी संघटना

रिसोड तालुका माहेश्वरी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

Risod Maheshwari Association: रिसोड तालुक्यातील माहेश्वरी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी विनोद लढ्ढा आणि सचिवपदी श्याम पल्लोड यांची निवड झाली.

रिसोड तालुका माहेश्वरी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

Risod Maheshwari Association

अध्यक्षपदी विनोद लढ्ढा, तर सचिवपदी श्याम पल्लोड यांची निवड

रिसोड (Risod Maheshwari Association) : येथील माहेश्वरी भवन येथे रिसोड तहसील माहेश्वरी संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही आणि गरिमामय वातावरणात पार पडलेल्या या सभेत संघटनेची आगामी काळासाठीची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. समाजाची एकजुटता आणि विश्वासाचे दर्शन घडवत पार पडलेली ही निवड प्रक्रिया समाजबांधवांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या (Risod Maheshwari Association) निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. पवन भंसाली यांनी काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणीची विधिवत घोषणा करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक उपअधिकारी कृष्णा पल्लोड सर आणि निवडणूक पर्यवेक्षक तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.राजकुमार मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनियुक्त पदाधिकारी मध्ये तहसील माहेश्वरी संघटना अध्यक्ष विनोद लढ्ढा तर सचिव श्याम पल्लोड यांची निवड करण्यात आली तर महिला संघटना कार्यकारिणी अध्यक्ष  सौ.सुरेखा पुरुषोत्तम तोष्णीवाल यांची तर सचिव पदी सौ. रूपा धूत यांची निवड करण्यात आली.

रिसोड तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. (Risod Maheshwari Association) नवनियुक्त पदाधिकारी आपल्या कार्यकाळात सेवा, सदाचार आणि संघटन ही त्रिसूत्री राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि समाजबांधवांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026