सहकारी बँक निवडणुक

रिसोडमध्ये सहकारी बँक निवडणुकीत चुरस; 100% मतदान, उद्या निकाल

Cooperative Bank Election: रिसोडमध्ये सहकारी बँकेच्या निवडणुकीत पूर्ण 100% मतदान झाले. आज निकाल जाहीर होणार असून अमित झनक यांच्या मातोश्री शोभा झनक यांच्या विजयाची शक्यता.

रिसोडमध्ये सहकारी बँक निवडणुकीत चुरस; 100% मतदान, उद्या निकाल

Cooperative Bank Election

रिसोड (Cooperative Bank Election) : अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठित मानली जाणारी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज  29 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. रिसोड शहरातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर पोचून आपले मतदानाचा हक्क बजावला.उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदानासाठी उत्साह दाखवला.

साडेबारा वाजेपर्यंत सर्व ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले. या (Cooperative Bank Election) निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अमित झनक यांच्या मातोश्री शोभा झनक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पाचरणे यांचे पुत्र डॉ. विठ्ठल पाचरणे यांच्यात सरळ सामना रंगला आहे. काँग्रेस विरुद्ध महायुती अशी ही प्रतिष्ठेची लढत ठरली असून आजी-माजी पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या (Cooperative Bank Election) चुरशीच्या लढतीत मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मतमोजणी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद कर्मचारी भवन सिव्हिल लाईन अकोला  होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 30 मार्च 12 वाजेपर्यंत  जाहीर होणार असून आमदार अमित झनक यांच्या मातोश्री शोभा झनक यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026