Reservation Protest

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लातुरात उद्या महामोर्चा; ५८ जाती समूहांचा सहभाग, आनंदराज आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लातुरात उद्या महामोर्चा; ५८ जाती समूहांचा सहभाग, आनंदराज आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

Reservation Protest

राज्य सरकारने प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, कृती समितीची मागणी; सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात

लातूर (Reservation Protest) : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या मूळ घटनात्मक उद्देशालाच धक्का बसणार असून समान संधीच्या तत्त्वालाही बाधा निर्माण होणार असल्याची भूमिका घेत अनुसूचित जाती प्रवर्ग उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, लातूर यांच्या वतीने सोमवार (दि. ६) रोजी लातूर येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामोर्चात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार बबनराव घोलप तसेच युवा नेते अमन आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कृती समितीच्या मते, अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ५९ जातींपैकी केवळ एका जातीकडून उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आली असून उर्वरित ५८ जाती समूहांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोणताही एकतर्फी निर्णय न घेता उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

महामोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता बौद्ध नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चा शाहू चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, गंजगोलाई, हनुमान चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, अशोक हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे पोहोचेल. तेथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महामोर्चामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार बबनराव घोलप तसेच युवा नेते अमन आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

महामोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन

महामोर्चासाठी शहराबाहेरून येणाऱ्या आंदोलकांनी आपली वाहने यशवंत विद्यालय मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसर तसेच पार्कच्या मागील विलासराव देशमुख मार्गावर पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधव, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, कर्मचारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन अनुसूचित जाती प्रवर्ग उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026