Rescue Team

काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!; अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता.

काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!; अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

Rescue Team

एकाच रात्री संग्रामपूर आणि राजुरा येथे दोन धाडसी बचाव मोहिमा यशस्वी; पुराच्या तावडीतून १६ नागरिकांची सुखरूप सुटका

अमरावती : ज्यावेळी चारी बाजूंनी मृत्यूचे थैमान सुरू असते, नद्यांचे रौद्ररूप मानवी वस्त्या कवेत घेण्यासाठी घोंगावत असते आणि काळोख्या रात्रीत आशेचा शेवटचा किरणही मावळत आलेला असतो; नेमक्या त्याच क्षणी स्वतःचा जीव मुठीत धरून मदतीला धावून येतात ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक.

३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि रेस्क्यू टीमच्या शौर्यामुळे या १६ जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

संग्रामपूरमध्ये छतावर अडकलेल्या ९ जणांची सुटका

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे गावालगत वाहणाऱ्या बेंबळा नदीने ३० जुलै रोजी रात्री रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी काही क्षणांत गावात शिरले. रात्री सुमारे ११ वाजता पूर अचानक वाढल्याने नागरिक घरात अडकले आणि प्राण वाचवण्यासाठी छतावर आश्रय घ्यावा लागला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या तात्काळ आदेशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक रात्री १२.१० वाजता सर्व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

रात्रीचा अंधार, वेगवान पुराचा प्रवाह आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पथकाने धैर्याने बचावकार्य सुरू ठेवले. वयोवृद्ध आणि लहान मुलांना प्राधान्य देत हनुमंत उके (३४), रवी मेश्राम (३८), सुभाष भोईर (४०), सतीश मारभते (२८), आशिष उके (१८), गौरव मारबले (२२), ओम गिरी (१८), अमोल भोयर (२९) आणि अनिकेत केवट (२५) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे यांनी सहभाग घेतला.

राजुरात सापांचा सामना करत ७ जणांची सुखरूप सुटका

याच रात्री राजुरा येथील मोखड नदीत पुराच्या पाण्यात ७ जण अडकल्याची माहिती रात्री ८.३५ वाजता नियंत्रण कक्षाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसरे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री ९.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले.

मोखड नदीतील पुराच्या पाण्यात मोठे लाकडी ओंडके, झाडेझुडपे तसेच विषारी साप वाहत येत असतानाही पथकाने कोणतीही भीती न बाळगता रबर बोटीद्वारे बचावकार्य सुरू केले. या सात जणांमध्ये ४ महिला, २ पुरुष आणि अवघ्या २ वर्षांची अनन्या जाधव यांचा समावेश होता.

अवघ्या ३० मिनिटांत पथकाने साहेबराव जाधव, सावित्री जाधव, पूनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव (वय २ वर्षे), सोनम जाधव आणि रीना जाधव यांना सुखरूप बाहेर काढले.

या मोहिमेत सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, आपदा मित्र तुळशीराम गोडाणे आणि भूषण काळे यांनी सहभाग घेतला.

दोन्ही बचाव मोहिमांदरम्यान महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. रात्रीच्या वेळी पार पडलेल्या या धाडसी बचावकार्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुराच्या तावडीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शोध व बचाव पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026
अमरावतीत २२ वर्षीय BAMS डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांचा आरोप

अमरावतीत २२ वर्षीय BAMS डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांचा आरोप

अमरावतीतील २२ वर्षीय BAMS डॉक्टर आदित्य रावते यांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांनी संशय व्यक्त केला असून व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे.

Sep 17, 2026