Drug Overdose

अमरावतीत २२ वर्षीय BAMS डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांचा आरोप

अमरावतीतील २२ वर्षीय BAMS डॉक्टर आदित्य रावते यांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांनी संशय व्यक्त केला असून व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे.

अमरावतीत २२ वर्षीय BAMS डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांचा आरोप

Drug Overdose

गोरे होण्यासाठी स्वतःहून औषधे घेत असल्याची माहिती; व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

अमरावती : अमरावती शहरात २२ वर्षीय BAMS डॉक्टर आदित्य रावते यांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोरे होण्यासाठी आदित्य स्वतःहून काही औषधे घेत असल्याची प्राथमिक माहिती असून, याच औषधांचा अतिरिक्त डोस घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. या घटनेने अमरावतीसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आदित्य रावते यांनी नाशिक येथून BAMS पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर अमरावतीतील एका नामांकित रुग्णालयात ते शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर म्हणून कार्यरत होते. घटनेच्या आदल्या रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर आदित्य आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ उलटूनही ते खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आदित्य खोलीत मृतावस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य यांना लहानपणापासूनच फिट म्हणजेच अपस्माराचा त्रास होता. याशिवाय, स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी ते स्वतःवरच उपचार करत काही औषधांचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आदित्य खोलीत उलट्या अवस्थेत आढळून आले होते. तसेच त्यांच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान, शवविच्छेदनादरम्यान श्वासावरोध, हृदयविकाराचा झटका किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. औषधांच्या सेवनाचा मृत्यूशी नेमका संबंध आहे का, हे स्पष्ट करण्यासाठी व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026