कळमनुरी उद्यान आग

कळमनुरी न.प च्या उद्यानला भीषण आग; झाडांसह यंत्रणांचे मोठे नुकसान

Kalmanuri fire: मार्च २२ रोजी शहरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात आग लागून गंभीर नुकसान झाले. वारंवार अशा घटनांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप लागत आहे.

कळमनुरी न.प च्या उद्यानला भीषण आग;  झाडांसह यंत्रणांचे मोठे नुकसान

Kalmanuri fire

प्रशासनाचे दुर्लक्षामुळे उधान झाले भक्कास

कळमनुरी (Kalmanuri fire) : शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानात दि. २२ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागून उद्यानातील गवतासह अनेक छोटी-मोठी झाडे जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाचा बेजबाबदार व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान, त्र्यंबक जाधव, मनोज नकवाल, राहुल इंगळे व मिलिंद पाईकराव यांनी तत्परता दाखवत आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला आणि (Kalmanuri fire) आग आटोक्यात आणण्यास महत्त्वाची मदत केली. त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत उद्यानातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या (Kalmanuri fire) आगीत झाडांना पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेली ठिबक पाईपलाईन पूर्णतः जळून खाक झाली, तसेच काही लहान मुलांची खेळणीही जळाली आहेत. याशिवाय उद्यानातील आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर खराब झाली असून सार्वजनिक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या उद्यानात यापूर्वीही २४ डिसेंबर रोजी आग लागली होती, तसेच उद्घाटनापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र त्या घटनांचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. वारंवार आग (Kalmanuri fire) लागूनही प्रशासनाने कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

उद्यानात ना योग्य देखरेख, ना अग्निसुरक्षा व्यवस्था — अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026