Prison Transfer

नांदेडमधील कुख्यात टोळीप्रमुखांचे कारागृहातील जाळे उद्ध्वस्त; मोक्कातील ७ सराईत गुन्हेगारांचे विविध कारागृहांत स्थलांतर

नांदेड शहरात संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात टोळीप्रमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

नांदेडमधील कुख्यात टोळीप्रमुखांचे कारागृहातील जाळे उद्ध्वस्त; मोक्कातील ७ सराईत गुन्हेगारांचे विविध कारागृहांत स्थलांतर

एकाच कारागृहात बंदिस्त असलेल्या टोळीप्रमुखांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांत हलविले

नांदेड : नांदेड शहरात संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात टोळीप्रमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सात सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्हा कारागृहातून राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांत स्थलांतरित करण्यात आले आहे.

नांदेड शहरात विविध सराईत गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि सदस्य सक्रिय होते. टोळ्यांमधील वादातून हिंसक घटना घडविणे, जबरी खंडणी, सुपारी घेऊन खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या टोळ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

हे सर्व सराईत गुन्हेगार नांदेड जिल्हा कारागृहात एकाच ठिकाणी बंदिस्त असल्याने त्यांच्या परस्पर संपर्कातून कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. प्रशासकीय कारणांसह नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही परिस्थिती धोकादायक ठरू शकत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष प्रस्ताव महासंचालनालयाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावानंतर गृह विभाग, कारागृह व सुधारसेवा महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार आणि न्यायालयाच्या परवानगीने सात सराईत गुन्हेगारांचे विविध कारागृहांत वर्गीकरण करून स्थलांतर करण्यात आले.

स्थलांतर करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कैलास जगदीश बिगानिया, अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार, साईसिंग उर्फ लाला दिपकसिंह गहेरवार, ईश्वरसिंग जयवंतसिंग गीरणीवाले, सुरेंद्रसिंग उर्फ सूरज जगतसिंग गाडीवाले, आश पाटील उर्फ कमलेश बालाजी लिंबापुरे आणि मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफार बेग यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्हा आणि शहर परिसरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे.

शहरातील शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026