प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका

रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण केला रेफर 

Primary Health Center Ambulance: महिलांना रुग्णवाहिकेच्या दाखलास नकार दिल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे आरोग्य कर्मचारी एकच शिपाई नेमवण्याची मागणी होत आहे.

रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण केला रेफर 

Primary Health Center Ambulance

प्रसूतीसाठी आली होती महिला 
नेहमीच होतो जबाबदारी झटकण्याचा प्रकार

जवळा बाजार (Primary Health Center Ambulance) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदारी झटकणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कोणताही रुग्ण आला की रेफर करण्याचे काम सुरू असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी ऐवजी रेफर करण्यासाठी एकच शिपाई नेमण्याची उपरोधिक  मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
   
महामार्गावर गाव असल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला शिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रति नियुक्ती वर पाठवण्यात आले. या आधी सुद्धा एका अपघाताच्या प्रकरणात खाजगी रुग्णवाहिकेमधील जखमी तरुणाला आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून घेण्यास वैद्यकीय अधिकारी व पारिचारिकेने नकार दिला होता.

मालेगाव येथील माहेरवाशीण मनीषा ओमप्रकाश इंगळे यांना प्रसूती वेदना होत असल्यामुळे त्यांच्या आप्तस्वकीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केला असता आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाने डिझेल नसल्याचे कारण सांगितले व रुग्ण आणण्यास नकार दिला. त्यानंतर सदर महिलेस खाजगी रुग्णवाहिकेने जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले. यानंतर प्रकरण अंगाशी शेकण्याची चिन्हे दिसू लागताच रुग्णवाहिकेच्या चालकाने 3000 रुपयांचे डिझेल रुग्णवाहिकेमध्ये भरले. सदर पेट्रोल पंपावर आरोग्य विभागाचा डिझेल भरण्याचा करार असताना रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे रुग्णवाहिकेमध्ये डिझेल भरण्यास टाळाटाळ केली जाते.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाला.

Sep 09, 2026
परभणीत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

परभणीत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Parbhani Hospital Protest: परभणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी एकत्रित करमंचारी डॉ. नागेश लखमावर यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन

Aug 14, 2026
'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

Aug 11, 2026