परभणी जिल्हा रुग्णालय

परभणीत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Parbhani Hospital Protest: परभणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी एकत्रित करमंचारी डॉ. नागेश लखमावर यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन

परभणीत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Parbhani Hospital Protest

डॉ. लखमावर यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी; आनंद भरोसेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

परभणी (Parbhani Hospital Protest) : येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या निलंबनाविरोधात जिल्हा रुग्णालयात शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. तब्बल ४ तास आंदोलन सुरू असताना शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी मंगळवार १८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमहोदयाशी बोलून निलंबन रद्द करण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले.

जिंतूर येथील गरोदर माता मृत्यूप्रकरणी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांना उपसचिव दीपक केंद्रे यांनी निलंबित केले.त्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८  वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारले. या निलंबनामुळे रुग्णालय कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.नंतर शिवसेना नेत्यांच्या आश्वासनानंतर तब्बल चार तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

या (Parbhani Hospital Protest) ठिकाणी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सारिका बडे, नानलपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम, शिवसेना नेते आनंद भरोसे यांसह आदींनी येथे भेट दिली. आंदोलनादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व कर्मचार्‍यांनी अधिष्ठाता चव्हाण यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहण्याचे अनेकदा फोन द्वारे कळविले. मात्र, अधिष्ठात्यांनी बर्‍याच वेळ फोन उचलले नाहीत आणि तब्बल तीन तासांच्या विलंबाने ते रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात पोहोचल्यानंतरही त्यांनी कर्मचार्‍यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, ज्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या संतापात भर पडली.

आनंद भरोसेंची मध्यस्थी... 
रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याचे पाहून शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्ते डॉक्टर व कर्मचार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. 'येत्या मंगळवारपर्यंत संबंधित मंत्री महोदयांशी थेट चर्चा करून डॉ. नागेश लखमावार यांचे निलंबन रद्द करण्याकरिता प्रयत्न करतो.असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

आंदोलन तात्पुरते मागे; बुधवारी १९ तारखेपासून संपाचा इशारा 
शिवसेना नेत्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून कर्मचार्‍यांनी आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले असून रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सेवा पूर्ववत केली आहे.तथापि, कर्मचार्‍यांनी आणि डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 'जर मंगळवारपर्यंत निलंबन रद्द झाले नाही, तर बुधवार १९ तारखेपासून जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी  संपावर जातील.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026