Prakash Pohare

गडचिरोलीतील प्रकल्पांसाठी सुपीक जमिनीच का? - प्रकाश पोहरे

गडचिरोलीतील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १३ गावांतील सुपीक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी विरोध केला. पडीत जमीन व झुडपी जंगलावर प्रकल्प उभारण्याची मागणी.

गडचिरोलीतील प्रकल्पांसाठी सुपीक जमिनीच का? - प्रकाश  पोहरे

शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा सवाल; बैलबंडी रॅली काढून शेतकऱ्यांनी केले प्रकाश पोहरे यांचे जंगी स्वागत

गडचिरोली : गडचिरोलीत उद्योग यावेत, विकास व्हावा, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, हा विकास करताना शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजबरीने अधिग्रहित करूनच का, असा सवाल देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी उपस्थित करून शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध केला.

चामोर्शी तालुक्यातील येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांतील जमिनी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी संपादित करण्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले असतानाही अनेक लोकप्रतिनिधींनी या सभेकडे पाठ फिरविली.

एमआयडीसी किंवा विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्यासाठी शासन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने हा लढा लढला पाहिजे, असा सल्ला प्रकाश पोहरे यांनी दिला.

शासनाकडे हजारो हेक्टर पडीत जमीन तसेच झुडपी जंगल असताना या जागेवर एमआयडीसी व इतर उद्योग प्रकल्प उभारावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांतील शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि नागरिक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026