Political Appointment

शिवसेना चिखली तालुका उपप्रमुखपदी संदीप नरवाडे यांची नियुक्ती

शिवसेना चिखली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. सर्कल, चिखली तालुका) पदावर संदीप दत्तू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना चिखली तालुका उपप्रमुखपदी संदीप नरवाडे यांची नियुक्ती

Political Appointment

पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी; शिवसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

चिखली (Political Appointment) : शिवसेना चिखली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. सर्कल, चिखली तालुका) पदावर संदीप दत्तू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन शंकरराव मोरे यांनी नियुक्तीपत्र देत २० जून २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख संजय सोनवणे आणि जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप नरवाडे यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. चिखली तालुका) पदावर एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्याबरोबरच शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल शिवसैनिकांसह विविध स्तरांतून संदीप नरवाडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026