वाढोणा मृत्यू प्रकरण

वाढोणा येथील एकाच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप 

Wadhona Murder case: वाढोणा येथील तत्कालीन ९ पोलिसांना बेंग्या नैनू पवार व राजू शेषराव पवार या दुवांच्यावर जन्मठेपचा आरोप सापडला. यानंतर रिसोड पोलिस ठाण्यातील अमानुष मारहाण

वाढोणा येथील एकाच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप 

Wadhona Murder case

 

आरोपी म्हणून पकडून आणलेल्या बेंग्या  पवारचा  अमानुष मारहाणीत झाला होता मृत्यू 
रिसोड पोलीस ठाण्यातील घटना 
पोलीस विभागात प्रचंड खळबळ 

हिंगोली (Wadhona Murder case) : सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बेग्या नैनू पवार रिसोड पोलिसांच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षकासह ९ पोलिस कर्मचार्‍यांना वाशीमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश जयसिंग झपाटे यांनी २ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत  जिल्हा सरकारी वकिल श्रीराम काळू आणि अ‍ॅड. मनीष साकळे , अ‍ॅड. प्रताप नायक, अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बैग्या नैनू पवार व राजू शेषराव पवार या दोघांना रिसोड पोलिसांच्या पथकाने १० मे २०११  रोजी पहाटे साडेतीन वाजता संशयावर ताब्यात घेतले होते. त्या दोघांना चौकशीसाठी रिसोड पोलिस ठाण्यात आणल्या नंतर त्यांना प्रचंड मारहाण केली  या मारहाणीत बैग्या यांचा मृत्यू झाला होता. तर राजू गंभीर जखमी झाला होता. राजू यांंना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.बेग्याचे यवतमाळ दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी मयत बैग्या याच्या कुटुंबियांनी रिसोड पोलिस विरुद्ध तक्रार दाखल केली बेग्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुुन्हा दाखल नसतांना मुलास पोलिसांनी उचलून नेले व त्यांना गंभीर मारहाण करून खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यांनतर सदर प्रकरणाचा तपास वाशीम सीआयडीकडे सोपाविण्यात आला होता. सीआयडीचे तत्कालीन उपाधिक्षक अन्वर शेख यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सण जून २०११ मध्ये खून तसेच अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीच्या पथकाने केला होता. सीआयडीच्या पथकाने  तपास करून वाशीमच्या न्यायालयात दाषारोप पत्र सादर केले होते.

या प्रकरणात एकूण ४७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने रिसोड पोलिस ठाण्यातील तत्कालीन ९ पोलिस कर्मचार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  गुरुवारी २ जुलै गुरूवार रोजी न्यायाधिश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी  सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड. श्रीराम काळू यांनी काम पाहिले तर मयत बैग्या पवार याच्या वतीने हिंगोलीचे जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. मनिष साकळे यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड. प्रताप नायक भगवतीकर, अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी सहकार्य केले. 

तसेच त्यांना वाशिम गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक ममता अफुणे रिसोडचे पोलीस कर्मचारी शृंगारे, अमर ठाकूर व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीना पाथरकर यांचे सहकार्य लाभले. १५ वर्षानंतर मयत बेग्या नैनू पवार यांचे आई कलाबाई, वडील नैनू, पत्नी संजीवींनी पवार कुटूंबाला न्याय मिळाला. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक माधव धांडे, पोलिस कर्मचारी मदन पवार,रमेश पवार, हिरालाल ताराम, शिवाजी खिल्लारी, अशोक वैद्य, वसंत जाधव, नागोराव खांडके, पंजाब पाटकर यांचा समावेश आहे.

 अशी सुनावली शिक्षा
आरोपी माधव धांडे, शिवाजी खिल्लारी, नागोराव खंडके व वसंत जाधव यांना अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(२)(८) मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अधिक २ महिने साधी कैद तसेच कलम ३(२)(२) मध्ये ५ वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद त्याचप्रमाणे कलम  ३(२)(७)  मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

संबंधित सामग्री

'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधी यांचे अमित शाहांना थेट पत्र

'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधी यांचे अमित शाहांना थेट पत्र

Rahul Gandhi Investigation: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून, 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई

Jul 26, 2026
दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

Yavatmal Bar Association Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेद

Jul 24, 2026
जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parbhani Bandh: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या परभणी बंदला व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संघटना...

Jul 23, 2026
दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नेरमध्ये लोकशाही बचाव मोर्चा

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नेरमध्ये लोकशाही बचाव मोर्चा

Anti-Lathi-Charge Protest March: दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नेर शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटना

Jul 23, 2026