परभणी बंद

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parbhani Bandh: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या परभणी बंदला व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संघटना...

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parbhani Bandh

 

वंचित बहुजन आघाडीची मोटारसायकल रॅली; प्रमुख बाजारपेठा बंद, चोख पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार

परभणी (Parbhani Bandh) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख बाजारपेठांतील अनेक दुकाने दिवसभर बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळाले.

बंदच्या (Parbhani Bandh) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, संदीप खाडे, शेख कलीम, मुजफ्फर खान, रंजीत मकरंद, गौतम भराडे, बापुराव मोरे, अशोक वायवल, अशोक आव्हाड, सचिन दत्तराव कांबळे, सय्यद नूर, प्रमोद अंभोरे, गणेश गाडे, एन. जी. खंदारे, यशवंत सोनवणे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच भीम आर्मी संविधान रक्षक दल मराठवाडाचे अध्यक्ष कचरू गोडबोले, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके, जिल्हा संघटक राजू खरात, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, परभणी राजगृह ब्रिगेडचे सुधीर साळवे, सुधीर कांबळे, विश्वजीत वाघमारे, प्रदीप वावळे यांच्यासह भीम आर्मी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

संबंधित सामग्री

पोलिस बंदोबस्त धुडकावत संतप्त शेतकर्‍यांची पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

पोलिस बंदोबस्त धुडकावत संतप्त शेतकर्‍यांची पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

Shaktipeeth Highway: बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या पदाधिकार्‍यांनी चक्क बैठकीत प्रवेश करून पालकमंत्र्यासमोर घोषणाबाजी

Aug 17, 2026
परभणीत कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा नाही..

परभणीत कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा नाही..

Parbhani Contract Workers: परभणीतील कंत्राटी कामगारांना वरचिका देण्याच्या मागणीत सर्वसाधारण एकता राहिली नाही. मात्र, स्वाभिमानी संघांनी कायमच पुढे येण्याचा निर्णय घेतला.

Aug 06, 2026
दिल्लीतील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मानोरा शहर कडकडीत बंद! 

दिल्लीतील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मानोरा शहर कडकडीत बंद! 

Manora Shut Down: मानोरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकर समावेशी संघटनांनी आमंत्रण दिले असून शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यावर ठरवले

Jul 23, 2026