हिंगोली (Hingoli Ganesh immersion) : शहरामध्ये दोन दिवसात श्री विसर्जन पार पडले. या बंदोबस्ताच्या ताणतणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी रविवारी हिंगोली शहर ठाण्यातील बसविलेल्या श्री चे विसर्जन केले. यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले होते.
हिंगोली शहरातील वेगवेगळ्या प्रभागात 104 ठिकाणी 14 सप्टेंबरला श्री ची स्थापना करण्यात आली होती सतत बारा दिवस अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद व स्पर्धांसह जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले. हिंगोली शहरातील श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 25 व 26 सप्टेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत 104 श्री विसर्जन केले यानिमित्त अनेक ठिकाणी मिरवणूकही काढल्या होत्या. सार्वजनिक गणेश मंडळाच्या (Hingoli Ganesh immersion) श्री चे विसर्जन झाल्यामुळे बंदोबस्ताच्या तणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील श्री च्या विसर्जनाची 27 सप्टेंबरला जय तयारी केली होती त्यानिमित्त बँड ढोल ताशाच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढली होती.
विसर्जन मिरवणुकीत बँक ढोल ताशाच्या निनादात पोलीस अधिकारी देवेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी थिरकले होते. एरवी शासकीय गणवेशात दिसणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी पिवळा नेहरू शर्ट व पांढऱ्या पॅन्ट मध्ये उठावदार दिसून येत होते. मै हु डॉन च्या गाण्यावर पोलीस अधिकारी ठाकूर यांनी केलेला भन्नाट डान्स हा मात्र अनेकांसाठी लक्षवेधी ठरला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जड अंतकरणाने श्री चे विसर्जन केले.