राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक

राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील 5 पोलीस अधिकाऱ्यांची निवड

President Police Medal: पोलीस, नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील 5 पोलीस अधिकाऱ्यांची निवड

राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील 5 पोलीस अधिकाऱ्यांची निवड

President Police Medal

नवी दिल्ली/ मुंबई (President Police Medal) : पोलीस तसेच नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील 5 पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशमन, होमगार्ड आणि नागरी संरक्षण सेवांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पदकांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने 14 ऑगस्ट रोजी पदक विजेत्यांची यादी जाहीर केली. उल्लेखनीय सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांची उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड

राष्ट्रपती पोलीस उत्कृष्ट सेवा पदकासाठी (President Police Medal) महाराष्ट्रातील अपर पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, उपपोलीस अधीक्षक सुभाष नानासाहेब भुजबळ आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राजाराम वायचळे यांची निवड करण्यात आली आहे. कारागृह सेवा श्रेणीत सुभेदार संजीव सखाराम घाणेकर आणि हवालदार संजय राजारामजी तळवारे यांची गुणवत्तापूर्ण सेवा पदकासाठी निवड झाली आहे.

पोलीस सेवेत महाराष्ट्रातील 37 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

पोलीस सेवा श्रेणीत महाराष्ट्रातील 37 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (President Police Medal) सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये उपपोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव, उपपोलीस महानिरीक्षक विजयकुमार गोपीनाथ मगर, पोलीस अधीक्षक दिगंबर पांडुरंग प्रधान, उपपोलीस अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, भागीरथ देशमुख, प्रवीण तेजले, मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक वैभवकुमार जाधव, संतोष बारगे, विश्वजीत कागिंडे, जितेंद्र कदम, विनोद पाटील आणि प्रदीप चौगावकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

अग्निशमन, होमगार्ड आणि कारागृह सेवेतही गौरव

अग्निशमन सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर उत्तम मिसाळ आणि अग्निशामक शैलेश महादेव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पोपट रामजी सांगडे, अशोक नामदेव इंगळे आणि मनोज सदाशिव बारसागडे यांचा सन्मान केला जाणार आहे. तर कारागृह सेवेसाठी अधीक्षक विकास हनुमंत राजनाळवार आणि हवालदार महेश लक्ष्मण गडनाईक यांची पदकासाठी निवड झाली आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेला (President Police Medal) राष्ट्रपती पदकाच्या माध्यमातून गौरविण्यात येणार आहे.