पातूर उन्हाचा तांडव

पातूर शहरात उन्हाचा तांडव; दुपारी रस्ते ओस तर व्यापारी व नागरिक उकाड्याने हैराण

Patur Heatwave: पातूर शहरात वाढत्या उन्हाच्या तापमानाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा दुपारी ओस पडतात. वाढत्या उष्णतेमुळे वृद्ध आणि लहान मुलांवर विपरीत परिणाम झाला आहे.

पातूर शहरात उन्हाचा तांडव; दुपारी रस्ते ओस तर व्यापारी व नागरिक उकाड्याने हैराण

Patur Heatwave

पातूर (Patur Heatwave) : गेल्या काही दिवसांपासून पातूर शहरात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून वाढत्या तापमानामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुपारी १२ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होतात की, शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (Patur Heatwave) कडक उन्हामुळे पातूर शहर दुपारी जणू 'कर्फ्यू' लागल्यासारखे सामसूम होत आहे.

या (Patur Heatwave) वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे यांसारख्या समस्या भेडसावत आहेत, तर लहान मुलेही उकाड्याने व्याकुळ झाली आहेत. उन्हाची तीव्रता पाहता नागरिक आरोग्याची काळजी म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुसरीकडे, पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात काम करणाऱ्या हातगाडी चालकांचे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे हाल बेहाल झाले आहेत.

दुपारी रस्ते ओस पडत असल्याने हातगाडीवर माल विकणाऱ्यांची विक्री निम्म्यावर आली आहे. डोक्यावर तळपणारे ऊन आणि रस्त्यावरील शांतता यामुळे दिवसभर उभे राहूनही अपेक्षित कमाई होत नसल्याने या कष्टकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (Patur Heatwave) उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक छत्री, रुमाल आणि शीतपेयांचा आधार घेत असून, पावसाळ्यापर्यंत ही उष्णता अशीच कायम राहण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला कायदेशीर सुरक्षाव्यवस्थेचा विचार करण्यास सांगितले. पालकांची संमती आणि वय पडताळणीचा मुद्दा चर्चेत आहे.

Sep 29, 2026
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
बांधकाम कामगारांच्या पाल्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती तत्काळ सुरू करा; पातूर तहसीलदारांना निवेदन सादर

बांधकाम कामगारांच्या पाल्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती तत्काळ सुरू करा; पातूर तहसीलदारांना निवेदन सादर

Construction Workers Children Scholarship: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांसाठी असलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना गेल्या काही काळापासून बंद

Sep 24, 2026