सेलू ठिय्या आंदोलन

परभणीत गतिरोधकाच्या मागणीसाठी साबां उपविभागात ठिय्या आंदोलन

Selu Thiya Andolan: परभणीत सेलू तालुक्यातील परतूर-मानवत रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी करणारे नागरिक ठिय्या आंदोलन करत आहेत. वाढत्या अपघातांमुळे तात्काळ उपाय योजनांची गरज आहे.

परभणीत गतिरोधकाच्या मागणीसाठी साबां उपविभागात ठिय्या आंदोलन

Selu Thiya Andolan

 

आठ दिवसांत गतीरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचे आंदोलन मागे

परभणी (Selu Thiya Andolan) : सेलू तालुक्यातील परतूर-मानवत रोड हा राज्य महामार्ग सेलू शहरातून जात असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. वाढत्या रहदारीमुळे वारंवार अपघात घडत असून तात्काळ गतीरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने बुधवार ६ मे रोजी नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सातोना रोड ते परभणी रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे शाळा, महाविद्यालये, हॉटेल, दुकाने तसेच नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका या मार्गाचे सिमेंट रस्त्यात रूपांतर झाल्याने वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी निषेध व्यक्त करत सुमारे एक तास (Selu Thiya Andolan) ठिय्या आंदोलन केले.

अखेर अभियंता बळीराम माने यांनी येत्या आठ दिवसांत संबंधित मार्गांवर गतीरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या (Selu Thiya Andolan) आंदोलनात जयसिंग शेळके, शिवशंकर मोरे, संतोष निर्वळ, गोविंद हरणे, भरत शेरे, पवन नाईक, समाधान निर्वळ, नितीन होगे, वैभव शेरे, राजू नाईक, मुंजा गाडेकर, गणेश शेवाळे, अक्षय जोशी, विराट तिर्थे, माऊली लेवडे आदींनी पुढाकार घेतला.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026