परभणी सहकार उपनिबंधक

परभणीचे तीन भूमीपुत्र बनले सहकार उपनिबंधक

Parbhani Deputy Registrar: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम. डी. शिंदे यांची उपनिबंधक, सहकारी संस्था पदी पदोन्नती

परभणीचे तीन भूमीपुत्र बनले सहकार उपनिबंधक

Parbhani Deputy Registrar

 

पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम.डी. शिंदे यांना पदोन्नती; परभणीकरांनी केला कौतुकाचा वर्षाव

परभणी (Parbhani Deputy Registrar) : जिल्ह्याच्या तीन भूमिपुत्रांनी परभणीकरांची मान उंचावली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम. डी. शिंदे यांची उपनिबंधक, सहकारी संस्था पदी पदोन्नती झाली आहे.

जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील रहिवाशी पंढरीनाथ घुगे यांची पुणे शहरासाठी उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर भगवान दुधाटे हे पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांची ठाणे येथे (Parbhani Deputy Registrar) उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मसला येथील रहिवाशी माधव देवराव शिंदे यांची डी. विभाग, मुंबई येथे उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे.या तिन्ही भूमिपुत्रांनी परभणी जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे.

परभणी करांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या (Parbhani Deputy Registrar) पदोन्नती बद्दल  पी. डी. देशमुख (मुख्य गुण नियंत्रक अधिकारी, कृषि विभाग, पुणे) , माजी जि.प. सदस्य अजित मगर,  कृषि अधिकारी बबन वाघ, रवि हरणे,  बाबासाहेब काळदाते,  पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस निरीक्षक परमेश्वर  कदम, विष्णुपंत मुंडे, कल्याण पाटील,   राहुल दराडे, सारंग घुगे, कमलाकर सांगळे, दिनेश दुधाटे, मुकुंद खिस्ते पाटील, दिपक नागुरे, गणेश पार्डे, सुभाष ठोंबरे, माधव यादव, गुलाब शिंदे, अच्युत तळणीकर, प्रशांत गायकवाड, सतीश कंची, सतीश सोळूंके  आदीसह कृषिमित्रांनी अभिनंदन केले.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026