परभणी रेल्वे गुन्हा

परभणीत सिग्नल वायर तोडून रेल्वे रोखली; चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ

Parbhani Railway Crime: परभणीत मानवत रोड रेल्वेस्थानकावर चोरट्यांनी रेल्वे सिग्नलचे वायर तोडून काकीनाडा साई एक्सप्रेस रोखून लुटमार केली. शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी सुमारे तीन लाखाची लुटमार केली.

परभणीत सिग्नल वायर तोडून रेल्वे रोखली; चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ

Parbhani Railway Crime

शस्त्राचा धाक दाखवत केली लुटमार; मानवत रोड रेल्वेस्टेशन परिसरातील घटना   

मानवत (Parbhani Railway Crime) : रेल्वे सिग्नलचे वायर तोडून छत्रपती संभाजी नगरहून गुरुवार १६ एप्रिलच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मानवत रोड रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांनी काकीनाडा साई एक्सप्रेस रोखली. चाकू, तलवार आदी शस्त्राचा धाक दाखवत जवळपास सव्वा तीन लाखाची लुटमार केली. अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गुरुवार १६ एप्रिलच्या पहाटे २.५० वाजेच्या सुमारास गाडी क्र. १७२०६ काकीनाडा साईनगर रेल्वे एक्सप्रेम मानवत रोड रेल्वेस्थानकात येत होती. काकीनाडा एक्सप्रेस  गाडीला मानवतरोड स्टेशन येथे थांबा नाही, मात्र सिग्नल मिळत नसल्याने ब्रीजजवळ रेल्वे थांबली. गाडी थांबतात चोरट्यांनी जनरल व एस ४ या डब्यामध्ये प्रवेश केला. चाकू, तलवारीचा धाक दाखवून महिला प्रवाशांचे दागिने लुटले. (Parbhani Railway Crime) रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी चोरटे पसार झाले. जवळपास सहा दरोडखोर होते. आरपीएफच्या जवानांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, कर्मचारी, एपीआय मिना, पोकॉ. पदमाकर मोगरे, डॉगक्वॉड, क्राईम शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिग्नल यंत्रणेचे केबल वायर दुरुस्त केली. या संपूर्ण घटनाक्रमा मुळे एक्सप्रेस तब्बल ४० मिनिटे मानवतरोड स्टेशनवर थांबली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोउपनि. दिलीप कांबळे व जीआरपी सपोनि. शैलेश जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगण्यात आले.

मानवत रोड येथे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात 

मानवतरोड रेल्वे स्टेशन येथे अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने येथे कायमस्वरूपी रेल्वे पोलीस बल चौकी सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली परंतु रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026