परभणी गोवंश कत्तली

परभणीत गोवंश कत्तलीच्या कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक?

Parbhani Cattle slaughter: परभणीतील सेलू शहरात गोवंश कत्तली कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणण्याची घटना घडली. पाच आरोपींना ताब्यात घेतले.

परभणीत गोवंश कत्तलीच्या कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक?

Parbhani Cattle slaughter

२० ते २५ जणांवर गुन्हा दाखल; पाच आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात...?

परभणी (Parbhani Cattle slaughter) :  सेलू  शहरातील रहेमान नगर भागात गोवंश कत्तलीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची खळबळजनक घटना रविवार २९ मार्च रोजी सकाळी घडली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात सहा नामजद आरोपींसह १५ ते २० अनोळखी लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार २९ मार्च रोजी सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास रहेमान नगर येथील नाल्यावरील पत्राच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक कारवाई करत असताना, तेथील आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखले. यावेळी (Parbhani Cattle slaughter) जमावाने पोलीस कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर, जप्त केलेले अंदाजे १०० किलो गोमांस, कातडी, गोवंशाचे अवशेष आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य (सुर्‍या, कुर्‍हाडी, तराजू)  जमावाने पळवून नेले. याद्वारे गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून परिसरात दहशत निर्माण केली गेली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांच्या फिर्यादीवरून रज्जाक जैरुद्दीन कुरेशी, मालजी चांद साहब कुरेशी, तला मालजी कुरेशी, मोबीन उर्फ गठुळा मुसा कुरेशी, जावेद नड्डू कुरेशी, सादिक रजाक कुरेशी आणि इतर १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख करत आहेत. सद्यस्थितीत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026