परभणी जिल्हा परिषद

परभणीत सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती घेणार्‍या कर्मचार्‍यांना सीईओंचा दणका....!

Parbhani Zilla Parishad: परभणीत जिल्हापरिषदेच्या सीईओ नतिशा माथूर यांनी रद्द केलेल्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे करमचार्यांना आपल्या मागील ठिकाणीवर काम करण्याचा आदेश दिला.

परभणीत सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती घेणार्‍या कर्मचार्‍यांना सीईओंचा दणका....!

Parbhani Zilla Parishad

 

जि.प.तील सर्व तात्पुरत्या व्यवस्था, पर्यायी पदस्थापना रद्द २४ तासात मुळ ठिकाणी हजर राहण्याचे आदेश

परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषदेतील काही वर्षानुवर्षे सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती, पर्यायी व्यवस्था आणि अतिरिक्त पदभाराच्या माध्यमातून एकाच ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांना जि.प. सीईओ नतिशा माथूर यांनी चांगलाच दणका दिला आहे. तात्पुरत्या व्यवस्था रद्द करुन २४ तासात मुळ ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीच्या आधारावर 'सोयीच्या ठिकाणी' सेवा बजावत कामचुकारपणा करणार्‍या  कर्मचार्‍यांना मोठा चाप बसणार आहे.

गेल्या काही वर्षांत विविध विभागांमध्ये तात्पुरत्या व्यवस्था, पर्यायी पदस्थापना, अतिरिक्त पदभार तसेच आठवड्यातील दोन दिवस जिल्हा परिषद मुख्यालयात आणि तीन दिवस मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक कर्मचार्‍यांनी आपापल्या सोयीची व्यवस्था करून घेतली होती. परिणामी दुर्गम व ग्रामीण भागातील कार्यालयांमध्ये कर्मचारी टंचाई निर्माण झाली होती. अनेक कार्यालयांमध्ये नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते, तर काही ठिकाणी विकासकामांनाही फटका बसत होता.

या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी १३ जुलै रोजी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे जिल्हा परिषद व तालुकास्तरावरील सर्व तात्पुरत्या व्यवस्था, पर्यायी व्यवस्था, अतिरिक्त पदभार तसेच विशेष कामकाजासाठी काढण्यात आलेले सर्व आदेश तत्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यमुक्त करून हजर राहणे आता बंधनकारक झाले आहे. आदेशात सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी आणि तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या नियंत्रणाखालील वर्ग-३ व वर्ग-४ अधिकारी-कर्मचार्‍यांना तातडीने मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यमुक्त करावे. तसेच संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष हजर झाल्याचा अहवाल २४ तासांच्या आत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आदेशाचे पालन न करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. सीईओ नतिशा माथूर यांच्या या निर्णयामुळे जि.प.तील शिथिल प्रशासनाला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सोयीच्या ठिकाणी राहून मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी न जाता कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांवर आता लगाम बसणार असून ग्रामीण भागातील रिक्त कार्यालयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.

Aug 25, 2026
सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्काराचे पातूर येथे निवेदन

सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्काराचे पातूर येथे निवेदन

Gram Panchayat Officer Death Case: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर..

Aug 21, 2026
लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis: लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर

Aug 19, 2026
पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

Pusegaon Gram Sabha: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभा गावापासून दूरच्या ठिकाणी आयोजित केल्याने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांमध्ये नाराजी

Aug 18, 2026
परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026