पातूर (Gram Panchayat Officer Death Case) : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने (डीएनई-१३६) १८ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामसभांच्या सचिव पदाच्या कामकाजातून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने पातूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामसभेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.
निवेदनातील मुख्य बाबी:
कामावर बहिष्कार: अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित होणाऱ्या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी 'ग्रामसभेचे सचिव' म्हणून कामकाज पाहणार नाहीत. * प्रशासनाला सहकार्याची भूमिका: प्रशासनाला सहकार्य करण्याची युनियनची तयारी असली तरी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने, तोपर्यंत पातूर तालुक्यातील ग्रामसभांसाठी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत पातूरचे तहसीलदार व युनियनच्या जिल्हा शाखेलाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्काराचे पातूर येथे निवेदन
Gram Panchayat Officer Death Case: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर..
Gram Panchayat Officer Death Case
संबंधित सामग्री
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..
Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय
मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया
१ ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल होणार असून, विलंब झाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणी आवश्यक राहणार आहे.
तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!
Talap Gram Panchayat: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी
गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले
Gummi Gram Panchayat: गुम्मी ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. दिपाली नंदकिशोर हुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा आवश्यक कोरम पूर्ण
ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप
Gram Panchayat Financial Irregularity: तालुक्यातील गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी मध्ये सन १ ऑक्टोबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय योजना