परभणी आर्थिक फसवणुक

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud

 

जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातील प्रकार 

परभणी  (Parbhani Financial Fraud) : लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक केली.१२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आफरा तफर करण्यात आली हा प्रकार परभणी येथील जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय येथे घडला. याप्रकरणी एका कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर १३ ऑगस्टला नवा मोंढा पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ.संजय कुमार पांचाळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फिर्याद दिली आहे. परभणी येथील कार्यालयात नेमनुकीला असलेले कनिष्ठ लिपीक विरेंद्र मोरेश्वर सुतवने तसेच तत्कालीन आहरन व संवितरण अधिकारी डॉ.विद्या भोजराज सरपे (कुलदिपक)सद्याचे अधिकारी  डॉ.पंढरीनाथ हरिभाऊ लखमवार यांच्या कार्यकाळात लिपीकाने लेखा व कोषागारमधुन एकुण चार वेळा शासनाची अधिकची एरीयस रक्कम स्वताच्या व्ययक्तीक खात्यावर घेतली.

याप्रकरणात उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजी नगर यांच्या आदेशाने त्रिस्तरीय चौकशी समितीने चौकशी केली. त्यामध्ये विरेंद्र सुतवणे यांनी १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची रक्कम व्ययक्तीक खात्यावर घेतली असून डॉ.विद्या सरपे,डॉ.पंढरिनाथ लखमवार यांचे सदर बाबींकडे हलगर्जी,निष्काळजी पना झाल्याचे दिसून आले. या अधिकार्‍यांनी वेतन देयक योग्य आहे की नाही हे तपासने आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. २९ मे २०२० ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रक्कम घेत शासनाची आर्थिक फसवणुक करण्यात आली. तिघांनीही संगणमत करुन आर्थिक फसवणुक करत स्वताचा आर्थिक लाभ मिळुन घेतल्याप्रकरणी नवा मोंढा पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि शिंदे करत आहेत.

संबंधित सामग्री

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

Aug 11, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026
परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

Gangakhed SIR Campaign: गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघ..

Aug 05, 2026
पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.

Aug 03, 2026