परभणी घरकुल आनुदान

परभणीत घरकुल आनुदानाचा निधी इतर खात्यावर वर्ग करत केला अपहार..?

Parbhani Gharkul Subsidy: परभणीतील सोनपेठ तालुक्यात, घरकुल आनुदान रकमीच्या २ कट्ट्या ५८ लाखांचा अपहार करण्यात आला. त्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांवर गुन्हा दाखल केला गेला.

परभणीत घरकुल आनुदानाचा निधी इतर खात्यावर वर्ग करत केला अपहार..?

Parbhani Gharkul Subsidy

 

२ कोटी ५८ लाखाची फसवणूक सोनपेठचे तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांवर गुन्हा...!

परभणी (Parbhani Gharkul Subsidy) : सोनपेठ  तालुक्यात लाभार्थ्यांना देय असलेली घरकुल अनुदानाची रक्कम लाभार्थ्यां व्यतिरिक्त इतर खात्यावर अनियमितपणे वर्ग करत २ कोटी ५८ लाख रूपयाचा अपहार करण्यात आला.  या प्रकरणी सोनपेठ नपचे तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांवर २ जुलै रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

म्हाडातील दक्षता व सुरक्षा विभागामधील सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. (Parbhani Gharkul Subsidy) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अनुदान रक्कम मिळाली होती. म्हाडाने या रक्कमेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी ताळमेळ करण्या करीता बोलावले होते. १० नोव्हेंबर २०२२ ते १ जुलै २०२५ या कालावधीतील बँक स्टेटमेंटची पाहणी केली असता घरकुल योजने अंतर्गत २ कोटी ५८ लाख इतका निधी लाभार्थ्यांना देय असतांना सदरचा निधी लाभार्थ्यां व्यतिरिक्त इतर खात्यावर अनियमितपणे वर्ग करण्यात आला.

वित्त नियंत्रक म्हाडा यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद सोनपेठ यांना सदर निधी म्हाडाकडे परत करण्याबाबत कळविले. मात्र (Parbhani Gharkul Subsidy) नगर परिषदेने उत्तर दिले नाही. शासन निधीचा अपहार करत फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांवर सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोनि. अशोक गिते  करत  आहेत. 

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026