परभणी गुटखा जप्ती

परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

Parbhani Gutkha Seizure: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

Parbhani Gutkha Seizure

 

स्थागुशाची पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ कारवाई

परभणी (Parbhani Gutkha Seizure) :  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १६ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, दिलीप निलपत्रेवार शेख इम्रान यांच्या पथकाने कारवाई केली. स्थागुशाचे पथक २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गंगाखेड पोलीस उपविभागात गस्तीवर असताना या पथकाला एका पांढर्‍या रंगाच्या क्रेटा गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करुन कोळवाडी गावाकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी सापळा रचत सदर संशयीत वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल, राजनिवास, डायरेक्टर, रजनिगंधा आदी ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. वाहनासह पोलिसांनी १६ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2026
परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.

Aug 28, 2026
परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

मुलाच्या लग्नासाठी दोन लाख रुपये घेतल्यानंतर परभणीत त्याचे लग्न लावून देण्यात आले.

Aug 28, 2026
परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining: परभणीत गुंज शिवाराच्या पांढरपानी नद्यापात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या सात ट्रॅक्टरांच्या मालकीवर ६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Aug 21, 2026
परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

Parbhani Retired Police: जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

Aug 20, 2026