Marriage Fraud

परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

मुलाच्या लग्नासाठी दोन लाख रुपये घेतल्यानंतर परभणीत त्याचे लग्न लावून देण्यात आले.

परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

Marriage Fraud

१८ ते २१ ऑगस्टदरम्यानचा प्रकार; फसवणुकीप्रकरणी सारिकासह नऊ जणांविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

परभणी : मुलाच्या लग्नासाठी दोन लाख रुपये घेतल्यानंतर परभणीत त्याचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, लग्नानंतर नवरीला घेऊन मध्यप्रदेशकडे रेल्वेने जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर नवरीसह तिच्यासोबतचे इतर व्यक्ती रेल्वेतून उतरले आणि तेथून पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्टदरम्यान परभणी शहर व परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी फसवणुकीचा आरोप करत एकूण नऊ जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तेजुबाई कनिराम बोडाना (रा. बडला, ता. रुपेता, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या मुलाच्या लग्नाबाबत विचारणा केली. महाराष्ट्रातील एका महिलेची ओळख असल्याचे सांगून तिच्याशी मुलाचे लग्न लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी दोन लाख रुपये घेऊन मुलाला सोबत घेऊन परभणीला येण्यास सांगण्यात आले.

फिर्यादी परभणीत आल्यानंतर त्यांना संबंधित मुलगी दाखवण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले. २१ ऑगस्ट रोजी मुलाचे लग्न लावण्यात आले. लग्नानंतर फिर्यादी संबंधित मुलीला घेऊन रेल्वेने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकावर रात्री सुमारे ११.४५ वाजता नवरी चालत्या रेल्वेतून खाली उतरली. तिच्यासोबत असलेले इतर व्यक्तीही त्याचवेळी रेल्वेतून उतरले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीच्या मुलाने त्यापैकी एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

यानंतर फिर्यादीने रिसोड येथे जाऊन संबंधित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीकडून दोन लाख रुपये घेत मुलाचे खोटे लग्न लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर नवरीसह सर्वजण रेल्वेतून उतरून पसार झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सारिका, राजु पाटील, गजानन वाढवे, आरती आणि इतर अज्ञात पाच व्यक्ती, अशा एकूण नऊ जणांविरोधात २८ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026