Mumbai March

मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरली; जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम असून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली. पाटोदा ते खोपोलीपर्यंतच्या मुक्कामाचे नियोजनही निश्चित झाले.

मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरली; जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Mumbai March

अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर मार्ग आणि मुक्कामाचे ठिकाण निश्चित; पाचव्या दिवशी सकाळी १० वाजता मुंबईत उपोषण सुरू करण्याचे आवाहन

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. उपोषणाच्या १५व्या दिवशी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे स्पष्ट केले. अंतरवाली सराटी येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुंबईकडे जाण्याचा मार्ग, प्रवासादरम्यानचे मुक्काम आणि आझाद मैदानापर्यंत पोहोचण्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईतील आझाद मैदानावर होणारे उपोषण बेमुदत असेल, अशी घोषणा त्यांनी केली.

मुंबईकडे जाण्यासाठी चार टप्प्यांमध्ये मुक्काम निश्चित करण्यात आला आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, दुसरा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, तिसरा पुण्यातील हडपसर येथे, तर चौथा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असेल. त्यानंतर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून सकाळी १० वाजता उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

या आंदोलनासाठी मराठा समाजाने आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या मराठा बांधवांनी नियोजनासाठी सक्रिय व्हावे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईकडे जाणारे आंदोलक आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी लढा देत असल्याचे नमूद करत, जे मुंबईला येऊ शकणार नाहीत त्यांनी आंदोलनाच्या मार्गावर येऊन पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जरांगे पाटील यांनी समाजासाठी एक दिवस देण्याचे आवाहन करत कामे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मराठा समाजाच्या ताकदीचा उल्लेख करत त्यांनी आंदोलनाचा उद्देश कोणाला आव्हान देणे किंवा विरोधासाठी विरोध करणे नसून समाजाच्या हितासाठी लढा देणे असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईकडे जाताना सर्वांनी एकाच मार्गाचा अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले. ज्या मराठा बांधवांकडे वाहने आहेत, मात्र त्यांना मुंबईपर्यंत आंदोलनात सहभागी होता येणार नाही, त्यांनी आंदोलकांना मुंबईपर्यंत सोडून पुन्हा परतावे, असे आवाहन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान शांततेचा मार्ग कायम ठेवण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. प्रवासात शिस्त पाळावी, वाहनांचे ओव्हरटेकिंग करू नये आणि दिलेला शब्द पाळावा, असे निर्देश त्यांनी मराठा बांधवांना दिले.

मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण बेमुदत राहणार असल्याचे पुन्हा स्पष्ट करत त्यांनी आंदोलकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे आणि सर्वांनी एकत्रितपणे मुंबईकडे रवाना व्हावे, असे सांगितले. न्यायव्यवस्थेकडून अन्याय होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत सरकारकडून अन्याय झाला तरी न्यायदेवता न्याय देईल, असेही त्यांनी म्हटले.

मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासाला दोन ते तीन दिवस लागू शकतात, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलकांनी दिलेल्या होकारानंतर मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026