Nitesh Karale

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

Nitesh Karale

वर्धा शहर पोलिसांची कारवाई; ‘आरक्षण हटाव’ विषयावरील व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

वर्धा : सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करत ही कारवाई केली. या घटनेमुळे वर्ध्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश कराळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अजय शंकरराव डोंगरे यांनी वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नितेश बाळकृष्ण कराळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्यांना अटक केली.

‘आरक्षण हटाव’ विषयावरील व्हिडीओवरून तक्रार

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ३१ जुलै २०२६ रोजी ‘आरक्षण हटाव’ या विषयाशी संबंधित एक व्हिडीओ नितेश कराळे मास्तर यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडीओतील कथित वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. तक्रारदाराने संबंधित व्हिडीओची लिंक तसेच इतर पुरावेही पोलिसांकडे सादर केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू

तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे वर्धा पोलिसांनी नितेश कराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, नितेश कराळे हे वर्ध्यातील प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. ते ‘कराळे मास्तर’ या नावानेही प्रसिद्ध असून, वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे संचालक आहेत.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026