Neuron Hospital

नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत; कक्षात सापडले बधिरीकरणाचे इंजेक्शन

डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार हे त्यांच्या कक्षात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत; कक्षात सापडले बधिरीकरणाचे इंजेक्शन

Neuron Hospital

धंतोलीतील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये खळबळ; डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा कक्षात मृतदेह आढळला, पोस्टमॉर्टम अहवालाकडे सर्वांचे लक्ष

नागपूर (Neuron Hospital) : धंतोली परिसरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले ४२ वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार हे त्यांच्या कक्षात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करून विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी डॉ. चांदेवार यांनी हॉस्पिटलमधील नियमित वैद्यकीय कामकाज पूर्ण केल्यानंतर आपल्या कक्षात प्रवेश केला. मात्र, दीड ते दोन तास उलटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी कक्षात जाऊन पाहिले असता डॉ. चांदेवार बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. तत्काळ तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तपासादरम्यान डॉक्टरांच्या कक्षात बधिरीकरणासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आढळून आले. त्यामुळे इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू इंजेक्शनच्या अतिमात्रेमुळे झाला, हृदयविकाराच्या झटक्याने झाला की आत्महत्येचा प्रकार आहे, याबाबत पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. चांदेवार गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि कौटुंबिक तणावाखाली होते. या तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले का, याचाही तपास सुरू आहे. डॉ. चांदेवार यांनी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना १५ वर्षांचा मुलगा आहे.

दरम्यान, पोलिसांनी डॉ. चांदेवार यांचा मोबाईल जप्त केला असून, नातेवाईक तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026