Navneet Gram Pahadi

नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध

रेगडी, हळदवाही व जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीत ग्राम पहाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रम पार पडला.

नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध

Navneet Gram Pahadi

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या मागणीची जिल्हा परिषद गडचिरोलीकडून दखल

घोट : रेगडी, हळदवाही व जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीत ग्राम पहाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रमुख पाहुणे मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये, विदर्भ केसरी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी फुलचंद वाघाडे, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, प्रवीण गेडाम, पलाश घरामी, रमेश लेकलवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे, तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांची आज देशाला गरज आहे, असे सांगितले.

यावेळी गुरुदेव भक्त व आयोजकांनी येथील विविध समस्या मांडल्या. नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले. तसेच या पर्यटनस्थळाला सर्वप्रथम ‘क’ वर्ग दर्जा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर श्री गुरुदेव भक्तांसोबत डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी पहाडीची पाहणी करून येथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तसेच येथील विकासाबाबत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे व वनपरिक्षेत्राधिकारी वाडीघरे साहेब यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली.

यावेळी डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली आहे. डॉ. प्रणय खुणे यांच्या मागणीवरून आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी या ठिकाणी बोअरवेलची मंजुरीसुद्धा दिलेली आहे.

नुकतीच डॉ. प्रणय खुणे यांनी नवनीत ग्राम पहाडी येथील विकासासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीकडे मागणी केली होती. या मागणीची दखल जिल्हा परिषद गडचिरोलीने घेतली असून, तसे पत्र पंचायत समिती चामोर्शी यांनाही पाठविण्यात आले आहे.

यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विश्वस्त नोनीगोपाल हलदर तसेच नवनीत ग्राम पहाडी व ग्रामपंचायत हळदवाही अंतर्गत विविध गावांतील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

BJP Surgical Strike: उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारीच्या तयारीला वेग दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेत पक्ष यावेळी उमेदवार निवड

Oct 04, 2026
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीत पुन्हा तणाव; भाजप सत्तेतून बाहेर, श्रीकांत शिंदेंना सहकार्य न करण्याचा निर्णय

उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीत पुन्हा तणाव; भाजप सत्तेतून बाहेर, श्रीकांत शिंदेंना सहकार्य न करण्याचा निर्णय

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप-शिवसेना वाद वाढला असून भाजपने उल्हासनगर महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 03, 2026
गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू. राष्ट्रवादीला 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांच्या सूत्रावर चर्चा; अंतिम निर्णय फडणवीसांकडे.

Oct 02, 2026