भाजप विधानपरिषद उमेदवार

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate

 

पुण्यातून डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना संधी

मुंबई (BJP Legislative Council Candidate) : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र झाली आहे. काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुण्यातून डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना संधी तर नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

यामध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघात (BJP Legislative Council Candidate) मोठा बदल करत धक्कातंत्र अवलंबले असून, इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या शरद लाड यांच्याऐवजी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने या तिघांना उमेदवारी: 

पुणे पदवीधर - स्मिता जाधव
नागपूर पदवीधर - सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक - कौस्तुभ गावडे

भाजपच्या केंद्रीय आणि प्रांतिक पातळीवरील घडामोडींनुसार, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे हायकमांडसोबत चर्चेसाठी शनिवारी दिल्लीला गेले होते. तिथे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या (BJP Legislative Council Candidate) तीनही मतदारसंघांतील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि आज दुपारी ही यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.