Nashik Firing

नाशिकमध्ये रात्री गोळीबाराची घटना; सुमित पगारे गंभीर जखमी

नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये रात्री गोळीबाराची घटना; सुमित पगारे गंभीर जखमी

गोसावी वाडी चौफुलीवरील घटनेत सुमित पगारे गंभीर जखमी; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज

नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिक रोड परिसरातील गोसावी वाडी चौफुली येथे पानटपरीसमोर उभ्या असलेल्या 32 वर्षीय सुमित पगारे याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात सुमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित पगारे हा गोसावी वाडी चौफुलीवरील पानटपरीसमोर उभा होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या सुमितच्या पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तसेच हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचाही तपास केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर गोसावी वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026