पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

..अखेर श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड एसीबी पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती

SP ShriKrishna Kokate: नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात श्रीकृष्ण कोकाटे यांना २६ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षकपदी पदस्थापना केली गेली. या काळात त्यांच्या जागेवर

..अखेर श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड एसीबी पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती

SP ShriKrishna Kokate

हिंगोली (SP ShriKrishna Kokate) : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे हे कार्यरत असताना त्यांच्या जागेवर डॉक्टर निलाभ रोहन यांची नियुक्ती झाली होती २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला परंतु पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना कुठेही पदस्थापना दिली नव्हती. अखेर पाच महिन्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. 

हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ मध्ये नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणूक दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली त्याच्याच दुसर्‍या दिवशी २२ डिसेंबरला त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाने काढले २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी हिंगोलीत पदभार स्वीकारला.

पोलीस अधीक्षक कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये दाद मागितली त्यावरून त्यांच्या बदलीला स्थगिती सुद्धा दिली होती. काही महिने मॅटमध्ये हे प्रकरण चालले एप्रिल व मे महिन्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी पदस्थापना देण्यात आली. या संदर्भात शासनाच्या गृह विभागाने २६ मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026