Nanded Bank Election

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपला; तुषार राठोड अध्यक्ष, मीनल खतगावकर उपाध्यक्ष

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपला; तुषार राठोड अध्यक्ष, मीनल खतगावकर उपाध्यक्ष

अशोक चव्हाणांना मुख्यमंत्र्यांचा फोन; देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अध्यक्षपदाची समीकरणे बदलली, निवडणूक बिनविरोध

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. शेतकरी विकास पॅनलने बँकेच्या 23 पैकी सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मीनल खतगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली होती. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने ही निवडणूक लढवली. बँकेच्या 23 संचालकपदांपैकी 11 संचालक सुरुवातीला बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक झाली. या प्रक्रियेत शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागा मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व निर्माण केले.

यानंतर बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदाच्या शर्यतीत बी. आर. कदम आणि मारोतराव कवळे यांची नावे चर्चेत होती. त्यातच भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांचे नाव पुढे आल्याने अध्यक्षपदाच्या निवडीला वेगळे वळण मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर बदलली समीकरणे

अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती समोर आली. आमदार तुषार राठोड यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद देण्याच्या सूचना फडणवीस यांनी चव्हाण यांना केल्याचे सांगितले जाते.

मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर अध्यक्षपदाच्या निवडीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार डॉ. तुषार राठोड यांच्या गळ्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली. तर उपाध्यक्षपद मीनल खतगावकर यांना देण्यात आले.

अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड बिनविरोध

आज, 10 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी भाजप आमदार डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मीनल खतगावकर यांची निवड झाली. विशेष म्हणजे दोन्ही पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली.

अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी सुरू असलेली नावांची चर्चा, त्यानंतर पुढे आलेले डॉ. तुषार राठोड यांचे नाव आणि खासदार अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांकडून झालेला फोन यामुळे नांदेड बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026