कन्हान नगरपरिषद अतिक्रमण

नाली आणि फुटपाथवरील अतिक्रमण काढुन, रस्ता अपघात मुक्त करा

Kanhan Municipal Encroachment: कन्हान नगरपरिषदेने नाली आणि फुटपाथवरील अतिक्रमण काढून रस्ता अपघात मुक्त करण्यासाठी कारवाई केली. हाकर्स युनियन व कृति समितीने मुख्याधिकारीना निवेदन दिले.

नाली आणि फुटपाथवरील अतिक्रमण काढुन, रस्ता अपघात मुक्त करा

Kanhan Municipal Encroachment

हाकर्स युनियन, कृति समिती व जेष्ठ नागरिक संघ व्दारे मुख्याधिकारीना निवेदनाने मागणी

कन्हान (Kanhan Municipal Encroachment) : नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासनाने आंनद रेस्टारेंट पासुन होम पाईप कंपनीच्या गेट पर्यंत फक्त एका बाजुला नाली व फुटपाथवर लगत दुकाने अतिक्रमण काढण्यांचे सामोर करून बुलडोजर चाल वुन ८० दुकाने तोडुन दुकानदाराना बेरेजगार केले. तोडलेल्या दुकानाचा मलमा व्यवस्थित न उचल्याने तेथेच सोडला. त्यावर ले-आऊट धारकाने त्याच रात्री दहा चका ट्रकने चुरी, गिट्टी, बोल्डर, दगड चा मलमा टाकला. काही ठिकाणची नाली फुटुन नाली जाम झाली. नाली बंद झाल्याने आरोग्यास आणि फुटपाथ रस्त्यावर ले-आऊट धारकाच्या या सामृग्रीने रस्त्याने ये-जा करण्यास अपघाताचा धोका निर्माण झाल्याने (Kanhan Municipal Encroachment)  नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष व मुख्याधिका री हयाना कन्हान हॉकर्स युनियन, कृती समिती आणि जेष्ट नागरिक संघ कन्हान व्दारे निवेदन देऊन नाली आणि फुटपाथ वरील अतिक्रमण काढुन, रस्ता अपघा त मुक्त करण्याची मागणी केली आहे. 

आटोमेटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ चे दोन पदरी सिमेट रस्ता बांधकाम करण्यात आले. कन्हान शहरात याच मुख्य राजमार्गाच्या दोन्ही बाजुला पक्की नाली बांधकाम व फुटपाथ करोडों रुपयाच्या खर्चाने तयार करण्यात आ ले. शहरातील मुलभुत सोयी, सुविधा यात गुजरी, आठ वडी बाजार, बस स्थानक, खेळाचे मैदान, सभागृह, दुकानाचे कॉम्पलेक्स आदीच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्याकरिता बंद हिंदुस्थान लिव्हरची जागा नगरपरि षदेने खरेदी करावी. अशी मागणी नगरपरिषद होऊन १० वर्षाच्या कार्यकाळात वारंवार निवेदन देऊन, आंदो लन करून करण्यात आली होती. तरी याविषयी दख ल न घेता. ही एकमेव जागा ग्रोमर व्हेंचर्स ले-आऊट धारकाने विकत घेऊन त्यावर ले-आऊट टाकण्यात आला. याच ले-आऊट धारकाच्या फायद्याकरिता (Kanhan Municipal Encroachment) नगर परिषद मुख्याधिकारी सह प्रशासनाने आंनद रेस्टारेंट पासुन होमपाईप कंपनी गेट पर्यंत फक्त एका बाजुला नाली व फुटपाथ लगत दुकाने (दि.४) जानेवारी २०२५ ला अतिक्रमण काढण्यांचे सामोर करून बुल डोजर चालवुन दुकाने तोडुन ८० दुकानदाराना बेरोजगार केले. तोडलेल्या दुकानाचा मलमा व्यवस्थित न उच ल्याने तेथेच सोडला.

याच नाली, फुटपाथवर ले-आऊ ट धारकाने त्याच रात्री दहा चका ट्रकने चुरी, गिट्टी, बो ल्डर, दगड चा मलमा टाकला. काही ठिकाणची नाली फुटुन नाली जाम झाली. नाली, फुटपाथ व रस्त्यावर ले-आऊट धारकाच्या सामृग्रीने रस्त्याने ये-जा करण्या स अडथळा निर्माण झाला. दि.०२/०८/२०२५ ला ले-आऊट धारकांच्या मटेरियल नेणा-या दहा चाकी ट्रक नालीवरून नेण्यात आल्याने होम पाईप कंपनी गेट जवळ रस्त्यालगतची भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधि करणाची नविन नाली तोडण्यात आली. यामुळे आरो ग्याचा आणि अपघाता धोका निर्माण झाल्याने नागरि कांनी वारंवार निवेदन देऊन नाली, फुटपाथ वरील ले-आऊट धारकाने टाकलेले साहित्य जप्त करून अतिक्र मण करणा-या ले-आऊट धारकावर दंडात्मक कारवाई करून नालीची सफाई आणि फुटपाथवरील अतिक्रम ण काढुन, रस्ता अपघात मुक्त करा. अशी मागणी के ली असुन एक वर्ष वोटुन सुध्दा (Kanhan Municipal Encroachment) नगरपरिषद प्रशासन का दखल घेत नाही ?  हा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

नाली व फुटपाथवर दुकानदाराने अतिक्रमण केले म्हणुन (Kanhan Municipal Encroachment) नगरपरिषद मुख्याधिका-यांनी आंनद रेस्टा रेंट पासुन होम पाईप कंपनीच्या गेट पर्यंत नाली व फुटपाथ लगत दुकाने अतिक्रमणाच्या नावाने तोडुन ८० दुकानदाराना बेरोजगार केले. शहरातील गांधी चौक ते नाका नं.७ पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुच्या नाली व फुटपाथ वरील अतिक्रमण काढले का नाही ? पुंजीपतीच्या साध्या मागणीवर अतिक्रमणाची कारवा ई नगरपरिषद प्रशासन त्वरित करते. परंतु त्याने केले ल्या अतिक्रमण काढण्यास नागरिकांनी वारंवार माग णी करून वर्ष लोटुन सुध्दा काढण्यात येत नाही का ? यामुळे शासन, प्रशासन जनतेच्या सेवे करिता आहे की, पुंजीपतीच्या सेवेकरिता आहे. अशी चर्चा नागरि कांमध्ये चांगलीच रंगत आहे. 
             
नगरपरिषद कन्हान-पिपरी मुख्याधिकारी (Kanhan Municipal Encroachment) आणि तत्कालीन नगराध्यक्ष हयाना कन्हान हाकर्स युनियन, कृति समिती व्दारे १) दि.१६/०१/२०२५, २) दि. १०/३/२०२५, ३) दि. ०५/०६/२०२५ व दि.०२/ ०२/२०२६ ला निवेदन दिले. तसेच जेष्ठ नागरिक संघ कन्हान व्दारे मुख्याधिकारी मा. दिपक घोडकी यांना निवेदन देऊन नाली आणि फुटपाथ वरील अतिक्रमण काढुन रस्ता अपघात मुक्त करा. तसेच रस्त्यालगतची भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ची नविन तोडलेली नाली दुरूस्त करून नाली योग्यरि त्या साफ करून शहरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहुन नेण्यास नाली सज्ज करावी जेणे करून रोगराईचा धोका संभावणार नाही.

संबंधित सामग्री

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

₹२० हजार कोटींच्या ई-चलन थकबाकीवर सुप्रीम कोर्टाच्या १० सूचना; RC, DL, PUC, Parivahan आणि वाहन जप्तीपर्यंत पर्याय.

Sep 29, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026