Motorcycle Theft

चिखली डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोर २४ तासांत जेरबंद

चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली.

चिखली डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोर २४ तासांत जेरबंद

Motorcycle Theft

बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी जप्त; मेहकर येथील आरोपीला अटक

चिखली (Motorcycle Theft) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. या कारवाईत चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथील सुभाष पांडुरंग सुसते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी यांनी ४ जून २०२६ रोजी त्यांची हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH 28 BM 3913) ही सुमारे ४८ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतील न्हाव्याच्या दुकानासमोर उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५४२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला.

पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला असता गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मेहकर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासादरम्यान आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन मेहकरहून चिखलीकडे येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

यानुसार डी.बी. पथकाने कोलारा फाटा येथे सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी विनाक्रमांकाची मोटारसायकल घेऊन येणाऱ्या संशयितास अडवून चौकशी करण्यात आली. वाहनाचे इंजिन आणि चेसिस क्रमांक तपासले असता ते चोरीस गेलेल्या मोटारसायकलीशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत आरोपीने आपले नाव वसीमखान बब्बुखान (वय ३५), रा. पैनगंगा नगर, मेहकर असे सांगितले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ४ जून रोजी चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीमधून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या पथकाचा सहभाग होता.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गवई आणि पोलीस कॉन्स्टेबल अजय इटावा करीत आहेत.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026