तापलेल्या प्लॅटफॉर्मवर कूल उपाय

कडक उन्हाने होरपळणाऱ्या विदर्भात आता रेल्वे प्रवाशांनादिलासा देणारी गार व्यवस्था सुरू झाली आहे.

तापलेल्या प्लॅटफॉर्मवर कूल उपाय

Mist Cooling System

आजपासून नागपूर स्थानकावर मिस्टिंग सुविधेला सुरुवात

नागपूर (Mist Cooling System) : कडक उन्हाने होरपळणाऱ्या विदर्भात आता रेल्वे प्रवाशांनादिलासा देणारी गार व्यवस्था सुरू झाली आहे. नागपूर रेल्वेस्थानक येथे आजपासून प्लॅटफॉर्मवर मिस्टिंग प्रणाली कार्यान्वित होत असून, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. तापलेल्या प्लॅटफॉर्मवर उभे राहणे जिथे अवघड झाले होते तिथे आता सूक्ष्म पाण्याच्या फवाऱ्यांमुळे थंडावा अनुभवायला मिळणार आहे.

मार्च अखेरपासून वाढलेल्या तापमानामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय वाढली होती. दुपारच्या वेळेत प्लॅटफॉर्मवर थांबणे कठीण होत होते तर प्रतीक्षालयांची क्षमता मर्यादित असल्याने अनेकांना उन्हातच थांबावे लागत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाने मिस्टिंग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफॉर्म क्रमांक १,२ आणि ३ वर बसवण्यात आलेली ही प्रणाली गाडी येताच सुरू होईल. छतावर लावलेल्या सूक्ष्म पाईपमधून दर काही मिनिटांनी अतिसूक्ष्म पाण्याचे फवारे सोडले जातील ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल. विशेष म्हणजे या फवाऱ्यांमुळे प्रवासी भिजत नाहीत तर फक्त थंडावा जाणवतो. वर्ल्ड क्लास स्थानकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ही आधुनिक सुविधा महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

मिस्टिंग प्रणाली म्हणजे काय?

ही एक आधुनिक शीतकरण यंत्रणा असून छतावर बसवलेल्या पाईपमधून अतिसूक्ष्म पाण्याचे फवारे सोडले जातात. हे फवारे वातावरणातील तापमान कमी करतात मात्र अंगावर पडूनही भिजल्यासारखे वाटत नाही. सुमारे १२ लाख रुपये खर्च करून ही प्रणाली उभारण्यात आली आहे.

प्रवाशांना कसा होणार फायदा?

उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर थांबणे त्रासदायक ठरते. मिस्टिंग प्रणालीमुळे थंडावा निर्माण होऊन गरम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. लू लागण्याचा धोका घटेल आणि प्रतीक्षेचा वेळ अधिक सुसह्य होईल. त्यामुळे उन्हाळ्यातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी ठरणार आहे.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या 10.86 किमी दुपदरीकरणाला मंजुरी. 497 कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्या आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.

Sep 18, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. दिल्ली-मुंबई, कोलकाता-दिल्ली, चेन्नई-कोलकाता आणि मुंबई-चेन्नई मार्गांचाही विस्तार केला जाणार आहे

Sep 09, 2026
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या अपघाताच्या भरपाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. रे

Aug 21, 2026
मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत पोस्ट मलकापूर येथे अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली.

Aug 21, 2026