मेंढपाळ बांधव आंदोलन

डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Shepherd Fasting Protest: मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी मेंढपाळ समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन

डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Shepherd Fasting Protest

 

आश्वासनानंतरही शासन निर्णय निघाला नाही; २७ ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

अमरावती (Shepherd Fasting Protest) : मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी मेंढपाळ समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संबंधित मंत्र्यांनी बैठका घेऊन मेंढपाळ बांधवांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते.

मात्र, बैठका होऊन आश्वासने मिळूनही अद्याप संबंधित शासन निर्णय (GR) निघालेला नाही. त्यामुळे मेंढपाळ बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.वन क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीने मेंढ्या शेळ्या चारण्यासाठी जाणाऱ्या मेंढपाळांना विनाकारण अडवू नये. त्यांच्यावर कारवाई करू नये, वन विभागामार्फत मेंढपाळावर दाखल करण्यात आलेले अन्यकारक गुन्हे व दंड प्रकरणाचा पुनर्विचार करण्यात यावा, सध्या शासनाकडून दहा मिनिटांची नुकसान भरपाई मर्यादा वाढवून 100 मेंढ्या पर्यंत करण्यात यावी. 

भटक्या मेंढपाळांच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करून त्यांचे हक्काचे रक्षण करावे, (Shepherd Fasting Protest) मेंढपाळ समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी निधी द्यावा, शेळ्या मेंढ्यासाठी पशुसंवर्धन विभागाने  मोफत लसीकरण आणि तपासणी शिबीर घ्यावे यास इतर मागण्या शासनाने पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली.

शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करून तातडीने शासन निर्णय काढावा, तसेच मेंढपाळांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी संबंधित प्रशासनाला आज अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. वारंवार आंदोलने, बैठका, चर्चा आणि आश्वासने होऊनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने आता २७  पासून सामाजिक कार्यकर्ते डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी आहे.

प्रतिक्रिया
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या अन्नत्याग आंदोलनाला वेळी आज लेखी आश्वासन दिलं होतं.. तसेच मुंबईत बैठक लावली होती. आश्वासन दिलं होतं, मात्र मुंबईत बैठक झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच वन विभागाने आमच्या धनगर बांधवावर आणि मेंढ्यावर कारवाई केली. एकीकडे बैठकीमध्ये आजपासून द्यायचं आणि दुसरीकडे कारवाई करायची हे अन्यायकारक आहे या विरोधात धनगर समाज पेटून उठेल. 
-अर्जुन महानर सामाजिक कार्यकर्ते

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ; वनहक्क धारक शेतकऱ्यांसाठीही शासनाचा मोठा निर्णय

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ; वनहक्क धारक शेतकऱ्यांसाठीही शासनाचा मोठा निर्णय

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या वारसांसह वनहक्क धारकांना लाभ; महसूल नोंद व ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक.

Sep 13, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026