MCOCA

पोयसर-कांदिवलीत दहशत माजवणाऱ्या ‘दादा’ टोळीवर MCOCA; मुख्य आरोपीवर ३७ गुन्हे

पोलिसांच्या नोंदीनुसार, मुख्य आरोपी दरेकर याच्याविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल ३७ गुन्हे दाखल आहेत.

पोयसर-कांदिवलीत दहशत माजवणाऱ्या ‘दादा’ टोळीवर MCOCA; मुख्य आरोपीवर ३७ गुन्हे

हप्ता न दिल्याच्या कारणावरून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; मुख्य आरोपी यमेश दरेकर फरार, दोन साथीदार न्यायालयीन कोठडीत

मुंबई : पोयसर-कांदिवली परिसरात दहशत निर्माण करून विविध गंभीर गुन्हे केल्याच्या आरोपाखाली यमेश दिलीप दरेकर उर्फ दादा आणि त्याच्या टोळीविरोधात समता नगर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात MCOCA, १९९९ अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, मुख्य आरोपी दरेकर याच्याविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल ३७ गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी यमेश दरेकर सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. तर त्याच्या टोळीतील रोहित कृष्णप्रताप सिंग (३३) आणि सागर अनिल राठोड (२२) या दोघांना १५ जून रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

हप्ता न दिल्याच्या कारणावरून मारहाणीचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हप्ता न दिल्याच्या कारणावरून तक्रारदाराला आरोपींनी कपडे उतरवून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी स्टंप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या वेळी यमेश दरेकर उर्फ दादा याने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मुख्य आरोपीवर ३७ गुन्ह्यांची नोंद

यमेश दरेकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्याविरोधात शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, शिवीगाळ व मारहाण, विनयभंग, शांतता भंग करणे, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच घरात अतिक्रमण करणे अशा विविध स्वरूपाचे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, यापूर्वी दरेकरविरोधात दोन वेळा MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोन वेळा त्याला तडीपार करण्यात आल्याचेही नोंदीत नमूद आहे.

दरेकरच्या टोळीतील रोहित कृष्णप्रताप सिंग याच्याविरोधात १३ गुन्हे दाखल आहेत. तर सागर अनिल राठोड याच्याविरोधात दोन गुन्ह्यांची नोंद असून, २०२३ मध्ये त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी MCOCAची कारवाई

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यमेश दरेकरने विविध गुन्हेगारांना एकत्र करून संघटित टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून मुंबई शहरात दहशत आणि वर्चस्व निर्माण करून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हिंसाचाराच्या माध्यमातून सातत्याने विविध बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली.

या मंजुरीनंतर यमेश दरेकर उर्फ दादा आणि त्याच्या टोळीविरोधात MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे करीत आहेत. संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरोधात संताक्रूझ पोलिसांकडून कठोर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026