एसआयआर मोहिम

जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी सुरु; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

SIR Campaign: जिल्ह्यात विशेष पडताळणीचे कार्यक्रम साजरे करताना, एसआयआर मोहिमेच्या अंतर्गत मतदारांचे नाव सादर करण्यासाठी घरोघर पाहुण्यांना बळी देण्यात येणार

जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी सुरु; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

SIR Campaign

दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम 
मतदार यादीतील नाव शोधा; ECINET ॲपचा करा वापर
बीएलओ घरोघरी जाऊन अर्जांचे वाटप करणार
घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करा

हिंगोली (SIR Campaign) : जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम आज मंगळवार (दि.30) पासून सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बीएलओंना मागील आठवडाभरा पासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. 

एसआयआरचा (SIR Campaign) मुख्य उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे हा आहे. यासाठी बीएलओ प्रत्येक मतदाराला दोन अर्ज देतील. त्यापैकी एका अर्जावर बीएलओची स्वाक्षरी असेल. हा अर्ज पुरावा म्हणून मतदार स्वतःकडे ठेवू शकतील. अर्ज हरवू नयेत किंवा त्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या (SIR Campaign) प्रक्रियेत प्रत्येक अर्जावर स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात आला असून, त्याद्वारे संबंधित मतदाराची ओळख आणि माहिती सहज पडताळता येणार आहे. मतदारांची माहिती २००२ मधील नोंदी तसेच अद्ययावत २०२५-२६ च्या मतदार यादीतील नोंदींशी पडताळली जाणार आहे. या नोंदींशी ज्यांची माहिती जुळेल, त्यांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही किंवा सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, ज्यांची पूर्वीची माहिती उपलब्ध नसेल, त्यांनी आई-वडील, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांची पूर्वीच्या मतदार यादीतील नोंद सादर करणे आवश्यक राहील. अर्जामध्ये मतदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदार ओळख क्रमांक, आई-वडील किंवा नातेवाईकांचे नाव, त्यांच्याशी असलेले नाते, विधानसभा मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक यांची माहिती भरावी लागणार आहे.

दुबार नावांवर विशेष लक्ष
एसआयआर मोहिमेदरम्यान (SIR Campaign) एखाद्या मतदाराचे नाव शहर आणि ग्रामीण भाग अशा दोन ठिकाणी असल्यास संबंधित मतदाराला दोन्ही ठिकाणी नोटीस बजावली जाईल. त्यानंतर सुनावणी घेऊन एका ठिकाणचेच नाव मतदार यादीत कायम ठेवले जाईल. जर मतदाराने दुबार नावाची माहिती दिली नाही, तर बीएलओ अॅपच्या माध्यमातून ती माहिती समोर येईल. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांनी खरी व अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

एसआयआर कार्यक्रमाचे वेळापत्रक:

३० जून ते २९ जुलै – घरोघरी जाऊन अर्जांचे वाटप
५ ऑगस्ट – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर – हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर – हरकतींवरील प्रत्यक्ष सुनावणी
७ ऑक्टोबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

प्रत्येक अर्जावर स्वतंत्र क्यूआर कोड
डाटा एन्ट्रीमधील चुका टाळण्यासाठी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी प्रत्येक अर्जावर स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात आला आहे. या क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, मतदार ओळख क्रमांक, पत्ता, अनुक्रमांक, मतदान केंद्र, भाग क्रमांक, विधानसभा व लोकसभा मतदारसंघ तसेच राज्याची माहिती पूर्वमुद्रित स्वरूपात उपलब्ध असेल. त्यामुळे माहितीची अचूकता राखण्यास आणि पडताळणी जलद करण्यास मदत होणार आहे.

मतदार यादीतील नाव शोधा; ECINET ॲपचा करा वापर
भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेले ECINET हे ॲप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करून २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव सहजपणे शोधता येते. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ECINET ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ८४ हजार ७६ मतदार

हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ८४ हजार ७६ मतदार

Hingoli Voter List: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील आपले नाव नागरिकांनी तपासावे.

Aug 31, 2026
SIR कार्यक्रमांतर्गत ई एस डी एम सी पी सी मतदाराची प्रत्यक्ष

SIR कार्यक्रमांतर्गत ई एस डी एम सी पी सी मतदाराची प्रत्यक्ष

SIR Vote Verification: एसआर कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाची डी एस डी अनामुली मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी शहरातील चोंडेकर गल्लीत प्रत्येक घरी एस आर कार्यक्रम

Aug 13, 2026
SIR 2026 Online Registration: 17 ऑगस्टपूर्वी नोंदणी करा; ECINet अॅपवरून मतदार यादीसाठी अर्ज कसा भराल?

SIR 2026 Online Registration: 17 ऑगस्टपूर्वी नोंदणी करा; ECINet अॅपवरून मतदार यादीसाठी अर्ज कसा भराल?

मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, 17 ऑगस्ट 2026 ही अर्ज सादर करण्याची महत्त्वाची अंतिम तारीख आहे.

Aug 06, 2026