हिंगोली मतदार सूची

हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ८४ हजार ७६ मतदार

Hingoli Voter List: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील आपले नाव नागरिकांनी तपासावे.

हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ८४ हजार ७६ मतदार

Hingoli Voter List

 

दावे, हरकती ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली (Hingoli Voter List) : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील आपले नाव नागरिकांनी तपासावे. आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. तसेच ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी (नमुना ६ व आवश्यक कागदपत्रांसह) मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यात एकूण आठ लाख ८४ हजार ७६ मतदार आहेत. यात चार लाख ६१ हजार २११ पुरुष, चार लाख २२ हजार ८५३ महिला आणि १२ इतर मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय वसमत येथे दोन लाख ९० हजार २२१, कळमनुरी येथे दोन लाख ९८ हजार ८५४, तर हिंगोली येथे दोन लाख ९५ हजार एक मतदार आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान विविध कारणांमुळे ८५ हजार ३१६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यात आढळून न आलेले ११ हजार ८२२, कायमस्वरूपी स्थलांतरित ४१ हजार ८७६, मृत २१ हजार ५१७, अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंद असलेले नऊ हजार ९२६ आणि इतर १७५ मतदारांचा समावेश आहे.

वसमत मतदारसंघात आढळून न आलेले तीन हजार २०० गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ५०९, मृत आठ हजार १५१, दुबार नोंद असलेले दोन हजार ८५७ आणि इतर ४२ असे एकूण २७ हजार ७५९ मतदार आहेत.

कळमनुरी मतदारसंघात आढळून न आलेले दोन हजार ३८७ गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ६१५, मृत सहा हजार १९७, अन्यत्र नोंदणी केलेले तीन हजार ४५३ आणि इतर ७२ असे एकूण २५ हजार ७२४ मतदार आहेत.

हिंगोली मतदारसंघात आढळून न आलेले सहा हजार २३५, कायमस्वरूपी स्थलांतरित १४ हजार ७५२, मृत सात हजार १६९, अन्यत्र नोंद असलेले तीन हजार ६१६ आणि इतर ६१ असे एकूण ३१ हजार ८३३ मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच hingoli.nic.in या हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचा निपटारा २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ०४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. संबंधित अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  मतदारांना संबंधित बीएलओशी थेट संपर्क साधण्यासाठी ECINET 3 ॲपवरील ‘Book a Call with BLO’ सुविधेचाही वापर करता येणार आहे. 

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 
जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी वसमत मतदारसंघात १२, कळमनुरीत ८ आणि हिंगोलीत ३ नवीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एक हजार १५ वरून एक हजार ३८ झाली आहे.

मतदारसंघनिहाय मदत कक्ष
मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वसमतसाठी ९०६७४ १०८१३, कळमनुरीसाठी ९०९६७ ४३१४२, तर हिंगोलीसाठी ९४०४५ ०६९१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्हास्तरीय मदत क्रमांक १९५० आहे.

संबंधित सामग्री

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे

Hingoli Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव

Sep 01, 2026
SIR 2026 Online Registration: 17 ऑगस्टपूर्वी नोंदणी करा; ECINet अॅपवरून मतदार यादीसाठी अर्ज कसा भराल?

SIR 2026 Online Registration: 17 ऑगस्टपूर्वी नोंदणी करा; ECINet अॅपवरून मतदार यादीसाठी अर्ज कसा भराल?

मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, 17 ऑगस्ट 2026 ही अर्ज सादर करण्याची महत्त्वाची अंतिम तारीख आहे.

Aug 06, 2026
जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी सुरु; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी सुरु; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

SIR Campaign: जिल्ह्यात विशेष पडताळणीचे कार्यक्रम साजरे करताना, एसआयआर मोहिमेच्या अंतर्गत मतदारांचे नाव सादर करण्यासाठी घरोघर पाहुण्यांना बळी देण्यात येणार

Jun 30, 2026