हट्टा (Maratha reservation) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत हट्टा येथील मराठा समाज बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असून त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हट्टा गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे.
शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी संबंधित प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.