आखाडा बाळापूर (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात राज्याभरातून मराठा समाज सहभागी होत आहेत सदर आंदोलनाला गावोगावी मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ ३ सप्टेंबर गुरूवारी आखाडा बाळापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला व मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पाठीशी सर्व समाज उभा आहे हे दाखवून देण्यात आले.
गुरूवारी सकाळपासून आखाडा बाळापूर मुख्य बाजारपेठ, बसस्थानक,बोल्डारोड, मराठवाडा चौक व संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाबतीत सगळ्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी सकल मराठा समाज आखाडा बाळापूर वतीने करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा आंदोलन करणाऱ्या मराठा यौद्वा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ आखाडा बाळापूर कडकडीत बंद बरोबर कामठाफाटा,वारंगाफाटा , डोंगरकडा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात येऊन शासनाने तातडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली.