जिल्हा परिषद शाळा

परभणीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा!

Zilla Parishad School:

परभणीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा!

Zilla Parishad School

 

पाथरीच्या आनंदनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न
लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

परभणी (Zilla Parishad School) : पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मागील दोन महिन्यांपासून शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून शिक्षकाची नियुक्ती करण्यात न आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाथरी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवत आंदोलन केले.

आनंदनगर तांडा येथील (Zilla Parishad School) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी एका शिक्षकाची बदली झाली असून दुसरे शिक्षक एसआयआरच्या कामात व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमित अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांकडून वारंवार करण्यात आली होती. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात येऊन शाळा भरवत आंदोलन केले.

दरम्यान गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी व आनंदनगर तांडा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत मागणी मान्य करण्यात येत असल्याचे लेखी पत्र त्यांनी दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड उपस्थित होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.

यावेळी आनंदनगर तांडा येथील माजी सरपंच विजय पवार, उपसरपंच अनिल राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंद पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

Warangaphata Zilla Parishad School: कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वारंगाफाटा शाळेतील ३५ हजार रुपये कीमतीचे साहित्य फोडून नासधूस करण्यात आली याबाबत अज्ञात इसमा विरूद्ध...

Sep 30, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026