वारंगाफाटा जिल्हा परिषद शाळा

वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

Warangaphata Zilla Parishad School: कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वारंगाफाटा शाळेतील ३५ हजार रुपये कीमतीचे साहित्य फोडून नासधूस करण्यात आली याबाबत अज्ञात इसमा विरूद्ध...

वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

Warangaphata Zilla Parishad School

आखाडा बाळापूर (Warangaphata Zilla Parishad School) : कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वारंगाफाटा शाळेतील ३५ हजार रुपये कीमतीचे साहित्य फोडून नासधूस करण्यात आली याबाबत अज्ञात इसमा विरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलिस पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वारंगाफाटा शाळेतील २६ सप्टेंबर दुपारी दिड ते २८ सप्टेंबर सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने शाळेतील खिडक्यांचे काच, एका संगणकाचे मॉनिटर व एक की बोर्ड फोडून ३५ हजार रुपयांचे नुकसान केले.

याबाबत मुख्याध्यापक लक्ष्मण पवार यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात २९ सप्टेंबर सायंकाळी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलिस पथकाने भेट दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख बालाजी जोगदंड करत आहेत.