मंत्री संजय राठोड

उद्या मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड पोहरादेवीत

Minister Sanjay Rathore: मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीतील मंदिर विकास आणि विरासत संग्रहालयाचे कामांचा आढावा घेतला. ते देवी जगदंबा समाधीस्थळी दर्शन घेऊन विरासत संग्रहालयाचा विकास कार्यक्रम

उद्या मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड पोहरादेवीत

Minister Sanjay Rathore

मानोरा (Minister Sanjay Rathore) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शनिवार दि. ३० मे रोजी सकाळी ९ वाजता बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल होणार असुन बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी व विकास कामाचा आढावा घेणार आहेत. 

  नुकतेच तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांना गती मिळणेसंदर्भात महंत मंडळाच्या एका शिष्टमंडळाने मुंबई येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मंदिर बांधकाम विकासाचे सर्व अडथळे दूर झाले असुन थांबलेली कामे वेगाने सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसातच पोहरादेवी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मंत्री संजय राठोड हे सर्वप्रथम देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन बनजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते महंत मंडळी यांची भेट व आशीर्वाद घेत पुढील कार्यक्रमासाठी हेलीकॉप्टरने यवतमाळकडे रवाना होणार आहेत. 

संबंधित सामग्री

ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जिंतूर व पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या आमरण उपोषणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

Sep 18, 2026
नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

Nagpur Tourism District: ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या नागपूरला राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास..

Sep 16, 2026
५८ लाख कुणबी नोंदींची प्रक्रिया सुरू, तरीहि जरांगेंच आंदोलन कायम? सरकारमध्ये नाराजीचा सूर

५८ लाख कुणबी नोंदींची प्रक्रिया सुरू, तरीहि जरांगेंच आंदोलन कायम? सरकारमध्ये नाराजीचा सूर

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्रिमंडळात चर्चा; ५८ लाख कुणबी नोंदी आणि मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या पुढील भूमिकेकडे लक्ष.

Sep 16, 2026
उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरी खुर्द तीर्थक्षेत्री कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थिती लाभली.

Sep 05, 2026
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी;  तिघांचा बचाव

मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.

Sep 05, 2026