जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी तहसील कार्यालयास भेट

Collector Rahul Gupta: कळमनुरी तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज भेट देऊन तहसीलस्तरावरील महसूल प्रशासनासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी तहसील कार्यालयास भेट

Collector Rahul Gupta

 

महसूल व विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा; प्रलंबित ई-केवायसी व अभिलेख अद्ययावतीकरणास प्राधान्य

हिंगोली (Collector Rahul Gupta) : कळमनुरी तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज भेट देऊन तहसीलस्तरावरील महसूल प्रशासनासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून विविध विषयांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी महसूल विभागाच्या कामकाजासह नागरिकांशी संबंधित प्रकरणे, प्रलंबित कामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच विभागनिहाय कामकाजाच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांची माहिती घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रलंबित अॅग्रीस्टॅक नोंदी, कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ई-केवायसी तसेच इतर प्रलंबित ई-केवायसी नोंदींची कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेऊन प्रलंबित नोंदींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच अभिलेख दुरुस्ती व अद्ययावतीकरणाची कार्यवाही पूर्ण करून शासकीय जमिनींसंदर्भातील सर्व अभिलेख व नोंदी Land Dashboard वर अद्ययावत स्वरूपात अपलोड करून घेण्याबाबतही विशेष सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दिल्या. शासकीय जमिनींच्या नोंदी अचूक, अद्ययावत व उपलब्ध स्वरूपात ठेवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामकाजावर नियमित लक्ष ठेवून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यास प्राधान्य द्यावे. शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते यांनीही संबंधित कामकाजात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. प्रलंबित नोंदींचे निराकरण, अभिलेख अद्ययावतीकरण तसेच शासकीय जमिनींच्या नोंदींची अचूकता व उपलब्धता याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कळमनुरी शहरातील स्वच्छतेची केली पाहणी

तहसील कार्यालयातील बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी शहरातील विविध भागांना भेट देऊन स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शहरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा, कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्था तसेच परिसरातील स्वच्छतेची सद्यस्थिती याबाबत त्यांनी माहिती घेतली.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा साचणार नाही, यासाठी नियमित कचरा संकलन व योग्य विल्हेवाटीची व्यवस्था प्रभावीपणे राबवावी. स्वच्छता व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ईदगाह परिसरातील शासकीय जमिनींची केली पाहणी

यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील ईदगाह जागेस भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शासकीय संस्थांना प्रदान करण्यात आलेल्या जमिनींची पाहणी करून संबंधित जमिनींची सद्यस्थिती, उपलब्ध क्षेत्र तसेच जमिनीच्या वापराबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शासकीय संस्थांना प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा संबंधित शासकीय प्रयोजनासाठी योग्य व प्रभावी वापर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. जमिनींच्या नोंदी व अभिलेख अद्ययावत ठेवण्यासोबतच प्रत्यक्ष स्थितीची नियमित पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, रोहयोचे उपजिल्हाधिकारी राजेश सरोदे, उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवक कांबळे, गटविकास अधिकारी अमित मुंडे, तालुका कृषी अधिकारी श्री. जाधव, तालुका भूमी अभिलेख अधिकारी नितीन गुरव,  यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 22, 2026
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

Sep 08, 2026