भूमी अभिलेख कार्यालय

कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri Land Records Office: कळमनुरी पोलिस ठाण्यात चार जणांना गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्वांना शिवीगाळ करून शिरस्तेदारांना शासकीय कामांच्या अडचणीत भूमिका घेतली गेली.

कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri Land Records Office

कळमनुरी (Kalamnuri Land Records Office) : शेती मोजणीच्या कारणावरून कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येऊन शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली. याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी २५ ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली.

फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक ८२/३ मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास आडे करीत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

बीडमध्ये मुलीला मारहाणीचा जाब विचारणाऱ्या महिलेचा मृत्यू; तीन आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

बीडमध्ये मुलीला मारहाणीचा जाब विचारणाऱ्या महिलेचा मृत्यू; तीन आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

राज्यातील बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे.

Jul 15, 2026