हिंगोली (School Girls Protest) : सेनगाव तालुक्यातील साखरा केंद्रांतर्गत येणार्या अनेक गावांतील शाळकरी मुला-मुलींना शाळेत येण्यासाठी वारंवार मागणी करूनही मानव विकास बस उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागासमोर ढोल बजाव आंदोलन करून लक्ष वेधले. साखरा येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा, तसेच इतर खाजगी शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरातील बोरखेडी (पिं.), बोरखेडा तांडा, साखरा तांडा यासह इतर गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी साखरा येथे ये-जा करतात. काही विद्यार्थी सायकलवर, तर काही पायी चालत शाळा गाठतात.
राज्य शासनाने शिक्षण सक्तीचे व मोफत केले असून शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. विशेषतः मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र परिवहन विभाग या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर चिखल व मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हिंगोली व सेनगाव परिवहन विभागाकडे मानव विकास मिशनची बस उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती.
मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर पालकांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना नेते राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुला-मुलींसह सेनगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर ढोल बजाव आंदोलन केले.आम्हाला मानव विकासची बस उपलब्ध करून द्या, अशी आर्त हाक यावेळी विद्यार्थी व पालकांनी दिली.
शाळकरी मुलींचे मानव विकास बससाठी ढोल बजाव आंदोलन
School Girls Protest: सेनगाव तालुक्यातील साखरा केंद्रांतर्गत येणार्या अनेक गावांतील शाळकरी मुला-मुलींना शाळेत येण्यासाठी वारंवार मागणी करूनही मानव विकास बस उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ
School Girls Protest
संबंधित सामग्री
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ
महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती
Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप
मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.