हिंगोली ई-केवायसी

हिंगोली जिल्ह्यात 12 हजार 252 ई-केवायसी प्रलंबित, एसबीआयमध्ये सर्वाधिक प्रकरणे

Hingoli e-KYC: जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी

हिंगोली जिल्ह्यात 12 हजार 252 ई-केवायसी प्रलंबित, एसबीआयमध्ये सर्वाधिक प्रकरणे

Hingoli e-KYC

हिंगोली (Hingoli e-KYC) : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही तालुक्यांमध्ये मिळून एकूण 12 हजार 252 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही.

यात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे हिंगोली तालुक्यात आहेत. हिंगोली तालुक्यात एकट्या 3 हजार 680 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल कळमनुरी तालुक्यात 2 हजार 839, औंढा नागनाथमध्ये 2 हजार 118, सेनगावमध्ये 1 हजार 943 आणि वसमत तालुक्यात 1 हजार 672 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

बँकनिहाय पाहणी केली असता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जिल्हाभरात सर्वाधिक 4 हजार 941 प्रकरणे प्रलंबित आहेत. हिंगोली शहरातील एसबीआय शाखेतच 1 हजार 336 प्रकरणे आहेत. याशिवाय कळमनुरीत 1 हजार 244, वसमत 865, औंढा 790 आणि सेनगावमध्ये 706 लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. या बँकेत जिल्ह्यात एकूण 2 हजार 680 प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सेनगाव तालुक्यात 840, कळमनुरीत 518, औंढा 460, वसमत 455 आणि हिंगोलीत 407 प्रकरणांचा समावेश आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रातही 2 हजार 34 प्रकरणे प्रलंबित असून त्यातील 995 प्रकरणे फक्त कलमनुरी तालुक्यात आहेत. युनियन बँक ऑफ इंडियात 748, बँक ऑफ बडोदात 671 आणि बँक ऑफ इंडियात 631 प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 195, सेंट्रल बँक ऑफ इंडियात 193, यूको बँकेत 96, इंडियन बँकेत 53 आणि पंजाब नॅशनल बँकेत 10 प्रकरणे प्रलंबित आहेत. आयसीआयसीआय बँक आणि डीसीसीबी यवतमाळमध्ये सध्या एकही ई-केवायसी प्रलंबित नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शेतकरी सन्मान निधी, विविध पेन्शन योजना तसेच इतर शासकीय अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित बँकांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लाभार्थ्यांनीही आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

सध्या एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांकडे प्रलंबित कामाचा मोठा भार आहे. त्यामुळे या बँकांमध्ये विशेष मोहीम राबवून ई-केवायसी पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे.

संबंधित सामग्री

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकरी मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि चारा छावण्यांसह ९ मागण्या मांडल्या.

Sep 18, 2026
उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

Sep 02, 2026
दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

Farm Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा अहवाल 24 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला आहे.

Aug 25, 2026
साखरेच्या दरात विक्रमी उसळी; ७,५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव, राजू शेट्टींनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

साखरेच्या दरात विक्रमी उसळी; ७,५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव, राजू शेट्टींनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

राज्यात साखरेच्या दराने अचानक मोठी झेप घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.

Aug 21, 2026